शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 12:14 IST

ऑफिसमध्ये जाऊन पुरवठा निरीक्षक महिलेला केली होती धक्काबुक्की

पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक महिला अधिकाऱ्याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभाष जगताप तळजाई वसाहत भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. जगताप त्यांच्या प्रभागातील नागरिकांचे शिधापत्रिकेचे काम घेऊन जुन्या जिल्हा परिषद कार्यालयातील अन्नधान्य वितरण कार्यालयात आले होते. त्यावेळी पुरवठा निरीक्षक महिला अधिकारी कार्यालयातील सहकाऱ्यांशी बोलत होत्या. जगताप यांनी कार्यालयात आरडाओरडा केला. महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून नोकरी घालवण्याची धमकी दिली.

जगताप यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर अपमानित केल्याचे महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सरकारी कामात अडथळा तसेच विनयभंग केल्या प्रकरणी जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेस