शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी ग्रामीण रुग्णालयात बोगस भरतीचे प्रकरण उघड; नियुक्ती पत्राद्वारे जवळपास २२ जणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 12:03 IST

सर्व बोगस नियुक्ती पत्रे इंदापूरमधील निलंबित शिपायामार्फत एक लाख प्रत्येकी पैसे घेऊन दिल्याची कबुली

आळंदी: ग्रामीण रुग्णालय शिपाई वर्ग चार पदासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांच्या बनावट सहीचे नियुक्ती पत्र देणाऱ्यांचे पितळ आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ ऊर्मिला शिंदे यांनी उघडे केले आहे. बोगस नियुक्ती पत्राद्वारे जवळपास बावीस जणांची फसवणूक झाली असून त्यांना जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयाचे नाव टाकून नियुक्ती पत्र दिले होते.            दरम्यान, सर्व बोगस नियुक्ती पत्रे इंदापूरमधील निलंबित शिपायामार्फत एक लाख प्रत्येकी पैसे घेऊन दिल्याची कबुली बोपोडी (पुणे) येथील एका तीस वर्षीय युवकाने दिली आहे. अधिक माहिती आळंदी पोलिसांकडून घेतली जात आहे. नियुक्ती पत्र दिलेल्यांमध्ये चार-पाच लोक नगर जिल्ह्यातील भिंगार येथील असून त्यांना यवत, जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे नियुक्तीचे पत्र दिले आहे. दरम्यान, आळंदी ग्रामीण रुग्णालय शिपाई पदासाठी बोपोडीतील युवकाकडून एक लाख रुपये घेतले. आणि जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांच्या खोट्या सहीचे नियुक्तीपत्र (दि. १५) रोजी नगर जिल्ह्यातील भिंगार येथे दिले. 

बुधवारी (दि.१६) हे पत्र घेऊन युवक आळंदीत आल्यावर येथील डाॅ. उर्मिला शिंदे यांनी सही बनावट असल्याचे ओळखले. ही रिक्त जागा आळंदी ग्रामीण रुग्णालयात नाही. शंका आल्याने डाॅ. शिंदे यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांना या प्रकाराची कल्पना दिली. तसेच आळंदी पोलिस ठाण्यालाही योग्य त्या कारवाई करण्याबाबत पत्र दिले. शुक्रवारी (दि.१८) आळंदी पोलिस ठाण्यात बोपोडीतील युवकाचा जबाब घेण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पत्र पाठवून कुणालाही रुजू करून न घेणे आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी केली जात असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीhospitalहॉस्पिटलfraudधोकेबाजीMONEYपैसा