विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

By Admin | Updated: March 13, 2016 01:39 IST2016-03-13T01:39:42+5:302016-03-13T01:39:42+5:30

विवाहितेच्या विनयभंगप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे़

In the case of molestation case, crime against couple | विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

बारामती : विवाहितेच्या विनयभंगप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे़
अरविंद रखमाजी भंडारे व राजेंद्र रावसाहेब शिंदे अशी या अरोपींची नावे आहेत. संबंधित विवाहिता दोन मुले, दोन भावांसह बारामती परिसरात वास्तव्यास आहे. तिचे पती पुणे रेल्वे स्टेशन येथे नोकरी करून उदरनिर्वाह करतात. २० फेब्रुवारीला संबंधित विवाहिता तिच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या दोन महिलांसमवेत शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी आली होती़ या वेळी मिरवणूक सदनिकेच्या खाली आल्यावर विवाहितेसोबत आरोपी अरविंद भंडारे याने दारूच्या नशेत गैरवर्तन केले़
या वेळी विवाहितेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: In the case of molestation case, crime against couple