नागरिकांत दहशत निर्माण करून मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:19 PM2021-10-08T17:19:36+5:302021-10-08T17:20:24+5:30

दहशत निर्माण करणाऱ्या मोबाईल चोरांना नागरिकांनी पकडून दणके देत केले पोलिसांच्या स्वाधीन केले

A case has been registered against three persons for stealing mobile phones by creating panic among the citizens | नागरिकांत दहशत निर्माण करून मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

नागरिकांत दहशत निर्माण करून मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Next

चाकण : पुढे जर कुणी आले तर एक एकाला खल्लास करून टाकील असे म्हणून दहशत निर्माण करणाऱ्या मोबाईल चोरांना नागरिकांनी पकडून दणके देत केले पोलिसांच्या स्वाधीन केले. असल्याची घटना खराबवाडी गावच्या हद्दीतील घडली.

चाकण औद्योगिक वसाहतीच्या खराबवाडी गावच्या हद्दीतील सारा सिटी ते जंबुकर वस्ती रस्त्यावर पायी चालत जाणाऱ्या इसमाला दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवून खिश्यातील मोबाईल चोरून घेऊन जात असताना, रस्त्यावरील लोकांना कोयत्याचा दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वजितसिंग बजरंग प्रताप ( वय.२१ वर्षे,सध्या रा.जंबुकर वस्ती,खराबवाडी) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलिसांनी प्रतीक आढाव ( वय.१९ वर्षे,रा.भोसरी ),सूरज बळीराम रोकडे (वय.१८ वर्षे  ५ महिने,रा.वाकी खुर्द ) यांना अटक करण्यात आली असून एक विधीसंघर्षित बालक या गुन्ह्यात सामील आहे.

खराबवाडी गावच्या हद्दीतील सारा सिटी ते जंबुकर वस्ती रस्त्यावरून सर्वजितसिंग आपल्या घराकडे पायी चालत जात असताना,येथील स्टील कंपनीजवळ एका दुचाकीवरून आलेल्या वरील तीन जणांनी फिर्यादीस पकडून लोखंडी पाइपने मारहाण केली. आणि कोयत्याचा धाक दाखवून खिश्यातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला तसेच दुचाकीवरून जाताना हवेत कोयता आणि लोखंडी पाइप दाखवत मोठ्याने ओरडत दहशत निर्माण करत पळून गेले. परंतु दुचाकीवरून पळून जाणाऱ्या तीन जणांपैकी सूरज व विधीसंघर्षित बालक या दोघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: A case has been registered against three persons for stealing mobile phones by creating panic among the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.