शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"कोंढवा हे मिनी पाकिस्तान.." असे वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 12:28 IST

संभाजी ब्रिगेडची कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार 

पुणे: कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याचठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे वक्तव्य करणाऱ्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकबोटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

पुणे शहरात असणारा मुस्लिम बहुल भाग म्हणून कोंढवा ओळखला जातो. याठिकाणी हज हाऊस बांधण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. परंतु या हाऊसला एकबोटे यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

शिवप्रेमींनी एकबोटेंच्या आमिषाला बळी पडू नये...  मिलिंद एकबोटे यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. यामुळे दंगल होण्याची शक्यता आहे. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. तरी आम्ही तमाम शिवप्रेमींना विनंती करतो की एकबोटे यांच्या आमिषाला बळी न पडता शांतता राखावी. आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

..............................

समस्त हिंदू महानगरपालिकेचा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही  याबाबत मिलिंद एकबोटे म्हणाले, कोंढव्यामध्ये हज हाऊस बनवण्याचे काम पुणे महानगरपालिकेने चालू केले आहे. ते अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. पुणेकरांची सुरक्षा धोक्यात येईल असा अतिशय घाणेरडा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेने जनतेच्या विकासासाठी जो पैसा खर्च होणे अपेक्षित आहे, तो पैसा हज हाऊसच्या बांधकामासाठी खर्च करायचा ठरवलेला आहे. चार कोटी रुपये महापालिका प्रशासनातर्फे हज हाऊससाठी तरतूद करण्यात आलेली आहे. ॲमिनिटी स्पेसमध्ये सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली हज हाऊसचे बांधकाम करण्याची पळवाट आयुक्तांनी शोधून काढली आहे. 

.........................

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार, प्रशासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम करता येणार नाही. परंतु सांस्कृतिक केंद्र म्हणून मान्यता घेऊन धूळफेक करून महानगरपालिका प्रशासनानेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे. समस्त हिंदू आघाडी आपली ताकद पणाला लावेल. समस्त हिंदू आघाडी कदापि महानगरपालिका प्रशासनाचा हज हाऊस निर्मितीचा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही.- मिलिंद एकबोटे,  समस्त हिंदू आघाडी                      

टॅग्स :PuneपुणेMilind Ekboteमिलिंद एकबोटेKondhvaकोंढवाPoliceपोलिसPakistanपाकिस्तानsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड