शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल'... अशी खंडणी मागणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 19:47 IST

पुणे सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी परिसरातील घटना

ठळक मुद्देकानकाटे टोळीने लॉज चालकाकडे मागितली खंडणी

पुणे : आम्ही ददू भाईची माणसे आहोत, लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल, असे सांगत शहरातील पुणे सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी परिसरातील  लॉज चालकाकडे खंडणीची मागणी करीत लॉजची तोडफोड केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गोरख कानकाटे टोळीवर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

शुभम उर्फ ददू कानकाटे (वय २४, रा. कोरेगाव, ता. हवेली), अमित डोरले (वय २०, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), साईराज कानकाटे (वय १९, रा.कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सोरतापवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांचे सोरतापवाडी येथे हॉटेल व लॉज आहे. २६ जुलैला डोरले त्याठिकाणी गेला असता त्याने तक्रारदाराला फोन देऊन बोलण्यास सांगितले. त्यानंतर फोनवरून ददू कानवटे याने त्यांच्याकडे ५० हजार रुपये हप्ता 5 तारखेपर्यंत द्यावा लागेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे दोन दुचाकीवरून आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी हातामध्ये कोयते फिरवून दहशत निर्माण करत लॉजवर दगडफेक केली. आरोपींनी आरडा-ओरडा केल्यामुळे शेजारील नागरिक पळून गेले. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमुळे लॉजच्या खिडक्या, दरवाजाचे नुकसान झाले. 

त्यानंतर आरोपींनी २८ जुलैला आरोपी दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदार यांना फोन करून लॉजच्या खाली बोलावून घेतले.  त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवले. धंदा करायचा असेल तर दर महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी दमबाजी केली. पैसे न दिल्यास तुझा धंदा चालू देणार नाही, अशी धमकी दिली. तू माझ्या डोक्यात बसू नकोस, मी लय वेडा आहे, मी तुला मारायला घाबरणार नाही, पोलीस माझे काहीही करू शकत नाहीत. तुझ्या शेजारचा लॉजवाला मला महिन्याला दहा हजार रुपये  देतो, तुला मस्ती आलीय, तुझी गेम करून टाकील, अशी आरोपीने धमकी दिली.

यानंतर तक्रारदार यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुंड गोरख कानकाटे याचा पुतण्या ददू व इतर अशा तिघांना अटक केली आहे. तर, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी