शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता करा गाजर हलव्याचा बेत ; राजस्थानातील गाजरांचा हंगाम जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 18:35 IST

गाजर हलव्यासाठी आवश्यक असलेल्या राजस्थानातील गोड गाजरांचा हंगाम मार्केट यार्डांत सुरु झाला असून, आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पुणे : लहानांनपासून मोठ्या पर्यंत प्रत्येकालाच गाजर हलवा प्रचंड आवडतो. याच गाजर हलव्यासाठी आवश्यक असलेल्या राजस्थानातील गोड गाजरांचा हंगाम मार्केट यार्डांत सुरु झाला असून, आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे गाजराचे दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मिठाई व्यावसायिक व गृहिणींकडून या हंगामात गाजरांना चांगलीच मागणी असते.     दरवर्षी साधारण नोंव्हेबर, डिसेंबरमध्ये राजस्थानातील गाजरांची आवक येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये सुरु होते. राजस्थानातील लालचुटूक, पाणीदार गाजर गोडीला देखील चांगले असतात. यामुळे हलव्यासाठी या राजस्थानी गाजरांना मागणी अधिक असते. मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.२३) रोजी सुमारे १० ते १२ ट्रक राजस्थानी गाजरांची आवक झाली. घाऊक बाजारात दहा किलो गाजरांना ११० ते ८० रुपये असा दर मिळत आहे. मागणी चांगली असली तरी आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने  किरकोळ बाजारात ११ ते  ८  रुपये किलो पर्यंत दर खाली आले आहे. सध्या बाजारात आलेल्या गाजरांची प्रतवारी देखील चांगली आहे. थंडी सुरु झाली की राजस्थानी गाजरांची आवक सुरु होते. नोंव्हेबर महिन्यात सुरु होणा-या राजस्थानी गाजरांचा हंगाम मार्च- एप्रिल महिन्यापर्यंत सरु राहतो, अशी माहिती गाजराचे व्यापारी बापू वाडकर यांनी दिली. 

गावरान गाजरांची संक्रातीच्या मुहूर्तावर आवकगावरान गाजरांचे उत्पादन गेल्या काही वर्षांत खूपच कमी झाले असून, केवळ संक्रातीच्या मुहूर्तावर सातार, पुणे जिल्ह्याच्या काही भागातून या गावरान गाजरांची आवक होते. याशिवाय रंगाने पिवळसर व थोडी तुरट असलेल्या गाजरे महाराष्ट्र व मध्ये प्रदेश येथून पुण्याच्या बाजारात विक्रीसाठी येतात. ही गाजरे वर्षभर कमी जास्त प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु राजस्थान येथील गाजरांचा हंगाम थंडीमध्येच चार ते पाच महिन्यांसाठीच असतो. राजस्थानी गाजर गोड असल्याने हलव्यासाठी मोठी मागणी असते. मार्केट याडार्तून गोवा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथे गाजरे विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे गाजराचे व्यापारी बापू वाडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्डPuneपुणे