मालवाहू गाडीला पिकअपची धडक

By Admin | Updated: April 2, 2017 02:59 IST2017-04-02T02:59:02+5:302017-04-02T02:59:02+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावर थांबलेल्या मालवाहू गाडीला पाठीमागून येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप ड्रायव्हर गंभीर जखमी

The cargo trucks pick up | मालवाहू गाडीला पिकअपची धडक

मालवाहू गाडीला पिकअपची धडक

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर थांबलेल्या मालवाहू गाडीला पाठीमागून येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. धडकल्याचा जोरदार आवाज आल्याने नागरिकांनी अपघातस्थळाकडे धाव घेऊन अपघातातील पिकअपचे दरवाजे तोडून अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढीत उपचारासाठी दवाखान्यात पोहोच केले.
पुणे-सोलापूर महामार्गावर आजपर्यंत झालेल्या अपघातात रस्त्यावर अनधिकृतपणे थांबलेल्या वाहनाला धडकून झालेल्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. असे असताना आर.टी.ओ. आणि वाहतूक पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे या हायवेवर अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. आज झालेला अपघातही त्याच प्रकारे झाला आहे.सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला मदनवाडी ब्रिज जवळ थांबलेल्या मालगाडीला (क्र. एमएच १२ एच.डी. ३२७४) पाठीमागून येणाऱ्या अंडी वाहतूक करणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्या एकमेकांत घुसल्या होत्या.(वार्ताहर)

Web Title: The cargo trucks pick up