शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident: भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:52 IST

चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावरील रहदारीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील धायरी गावात एका भरधाव चारचाकी कारने दिलेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास धायरी ते रायकर मळा रस्त्यावरील सम्राट स्टेशनरी शॉपसमोर घडली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील वाढत्या वेगामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली मंगेश तारू (वय २७, रा. धायरी, पुणे) या रस्त्याने जात असताना हा भीषण अपघात झाला. आरोपी चालक साहिल हुसेन शेख (वय ४९, रा. रायकर मळा, धायरी) हा आपल्या ताब्यातील कार घेऊन जात होता. त्याने आपली कार अत्यंत भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून दीपाली यांना पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दीपाली यांना गंभीर दुखापत होऊन त्यातच त्यांचा अंत झाला.या प्रकरणी मृत दीपाली यांचे नातेवाईक नीलेश दत्तात्रय तारू (वय ३७ ) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी चालक साहिल शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील रहदारीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे साहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भरवस्तीत झालेल्या या अपघातामुळे धायरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार एस. बी. वावरे करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Accident: Speeding Car Kills Woman in Dhayari

Web Summary : A 27-year-old woman died in Dhayari, Pune, after being hit by a speeding car. The driver, Sahil Sheikh, has been arrested. Police are investigating the fatal incident. The accident has caused outrage among local residents due to frequent speeding.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यूArrestअटकcarकारDhayariधायरी