शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बारामती—पुणे मार्गावर  कार आणि बुलेटचा अपघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:31 PM

बारामती—पुणे मार्गावर मेडद गावच्या हद्दीत कार आणि बुलेटचा सोमवारी (दि. १६) सकाळी  गंभीर अपघात झाला.

ठळक मुद्दे तिघे जखमी : बारामतीच्या उद्योजकासह दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

बारामती : बारामती—पुणे मार्गावर मेडद गावच्या हद्दीत कार आणि बुलेटचा सोमवारी (दि. १६) सकाळी  गंभीर अपघात झाला. यामध्ये बारामती एमआयडीसीतील उद्योजकासह बुलेट चालविणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. तर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये उद्योजकाच्या कुटुंबियांचा समावेश आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि बुलेटचा सकाळी अपघात झाला. यामध्ये उद्योजक सुनील हेमराज बोथरा (वय ५०,रा.सध्या रा.,रुई,बारामती. मुळ रा. जगदीप सोसायटी,एरंडवणे) हे त्यांच्या कार ( एमएच ४२— के— ९४४६) मधुन पुण्याहुन बारामतीच्या दिशेने येत होते. तर बुलेटवरील तरुण अरबाज अरीफ बागवान (वय २०, रा. सुपे) हा बारामतीहुन सुपे येथे निघाला होता. मात्र, दोन्ही वाहनांची धडक होउन गंभीर अपघात झाला.यामध्ये उद्योजक बोथरा यांच्यासह शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांना अपघातानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र,उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.तसेच अपघातामध्ये बोथरा यांच्यासमवेत त्यांच्या कारमध्ये बसलेली यांची पत्नी मनिषा सुनील बोथरा (वय ४५) मुलगा,सौरभ सुनील बोथरा (वय २५),मुलगी महक सुनील बोथरा (वय ११) हे तिघे जखमी झाले आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात केवळ मृत आणि जखमींची नोंद झाली आहे.अपघाताची फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसेले यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. घटनेची माहिती समजताच बोथरा यांचे मेहुणे पुणे येथील काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभय छाजेड यांनी बारामतीमध्ये धाव घेतली. बोथरा हे एमआयडीसीतील बडे उद्योजक होते.त्यांचा एमआयडीसीमध्ये रीक्षा कंपनीला  आवश्यक सुटे भाग बनविण्याचा कारखाना आहे.येथील अमेय उद्योग समुहाचे ते प्रमुख होत. मनमिळाउ असलेल्या बोथरा यांच्या अपघाती मृत्युची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली. 

टॅग्स :BaramatiबारामतीAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस