देहूरोडजवळ कारचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 16:47 IST2019-07-07T10:23:56+5:302019-07-07T16:47:14+5:30
पुणे-बंगळुरू महामार्गावर देहूरोड येथील सेंन्टोसा हाॅटेलसमोर रविवारी पहाटे कारला झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

देहूरोडजवळ कारचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
देहूरोड : मुंबई बंगळूरु महामार्गाच्या देहूरोड -कात्रज बाह्यवळण मार्गावरील रावेत येथे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यालगत उभ्या मालमोटारीला मोटारीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
रविवारी सकाळी मुंबईहून देहूरोड _कात्रज बाहयवळण मार्गे पुण्याकडे जाणारी एक मोटार (एम एच १२ ईएम ७९४४) ही भरधाव रस्त्याच्यालगत उभ्या असलेल्या मालवाहू मोटारीला ( जीजे ३१ टी २६१४) मागून जोरदार धडकल्याने झालेल्या दिल्याने अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पराग हेरेगावकर ( रा कोथरूड, पुणे ), निलेश हरिभाऊ सांळूखे (पुणे ) व अभिषेक शर्मा ( रा काशीपूर, उत्तराखंड ) अशी अपघातात मृत्युमुखी पावलेल्या तिघांची नावे आहेत तसेच सूरज राजेंद्र मांजरे (वय २७ रा सांगवी, पुणे ) हे गंभीर जखमी असून देहूरोड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर थेरगाव (चिंचवड ) येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना स्थलांतर करण्यात आले आहे. धडक एवढी जोरदार होती की तिघांचेही मृतदेह छिन्न विछीन्न अवस्थेत मोटारीत आढळून आले.