ऊसतोडणी मजुरांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST2020-12-17T04:37:37+5:302020-12-17T04:37:37+5:30
बारामती: माळेगाव साखर कारखाना स्थळावर ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना विद्यानंद फाऊंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यानंद फाऊंडेशनच्या व्यावस्थापकिय ...

ऊसतोडणी मजुरांच्या
बारामती: माळेगाव साखर कारखाना स्थळावर ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना विद्यानंद फाऊंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यानंद फाऊंडेशनच्या व्यावस्थापकिय संचालिका प्रीती निंबाळकर यांनी सांगितले, कोरोनामुळे खासगी व सरकारी शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. येथील ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना काही स्वयंसेवक कारखाना स्थळावर जाऊन शिक्षण देत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. या गोष्टीची माहिती मिळताच विद्यानंद फाऊंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे ३० किट एक फळा व चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कष्टाच्या मागे पळत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणीतरी झटत असल्याचे पाहून ऊसतोडणी कामगारांनी समाधान व्यक्त केले.
----------------------------
ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना विद्यानंद फाऊंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
१६१२२०२०-बारामती-२४