शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची उमेदवारी गमावलेले महापौरपदाच्या शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 12:00 IST

बापट-काकडे-पाटील यापैकी कोणता गट मारणार बाजी?

ठळक मुद्देखुल्या आरक्षणामुळे चुरस : कुरघोडीचे राजकारण रंगणारविधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच पुणे महापालिकेच्या महापौरपदाची मुदत संपली होती

पुणे : राज्यातील महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी पार पडली. पुणे महापालिकेला आलेल्या ‘खुल्या’ आरक्षणामुळे विधानसभेला उमेदवारीने हुलकावणी दिलेल्या नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापौरपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवक पुढे आले असले तरी ‘ज्येष्ठता’ हा निकष लावला. 

जाणार आहे. त्यामुळे खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यापैकी कोणता गट बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच पुणे महापालिकेच्या महापौरपदाची मुदत संपली होती. परंतु, राज्य शासनाने त्याला तीन महिने मुदतवाढ दिली होती. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका लागल्या. कोथरूडमधून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्यासह सुशील मेंगडे यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने दोघांच्याही मनसुब्यांवर पाणी फेरले गेले होते. त्यातही मोहोळ यांनी जोरदार तयारी केलेली होती. कसबा मतदारसंघामधून नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने हे सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी करीत होते. परंतु, उमेदवारी विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी गमावलेले मोहोळ, मेंगडे, घाटे आणि रासने यांनी महापौरपदासाठी तयारी सुरू केली आहे. यासोबतच पर्वती मतदारसंघामधून विद्यमान सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनीही उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षाने विद्यमान आमदारांनाच पसंती दिली होती. आता भिमाले पालिकेतील कामाचा अनुभव पुढे करून महापौरपदासाठी आग्रही राहतील. यासोबतच नगरसेवक राजेंद्र शिळीमकरही शर्यतीत आहेत. ज्योत्स्ना एकबोटे, वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे या ज्येष्ठ नगरसेविकाही आशा लावून आहेत. परंतु, अडीच वर्षे महिलेकडेच महापौरपद असल्याने यावेळी पुरुष नगरसेवकाचा विचार होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. पक्षाच्या गोटातून मोहोळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. ............

कुरघोडीचे राजकारण रंगणारमहापालिकेतील महापौरपद बहाल करताना येत्या अडीच वर्षांत पुन्हा लागणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या ‘गणितां’चाही विचार पक्षाला करावा लागणार आहे. यावेळी शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, संजय काकडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटांच्या नगरसेवकांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगणार आहे. काही नगरसेवक तर थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांची मनधरणी करण्याची शक्यता आहे. परंतु, राज्यातील राजकीय पेचप्रसंगामुळे हे नेते पुण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीत कितपत लक्ष घालू शकतील, हा प्रश्नच आहे.  ........महापौर बदलानंतर उपमहापौरपदही बदलावे लागणार आहे. परंतु, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयने मात्र उपमहापौरपद आपल्याकडेच हवे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे पद भाजप काढून घेते की आरपीआयकडेच ठेवते याकडेही लक्ष लागले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा