शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 1:02 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या असून नागरिकांना दक्षतेचे आवाहन

ठळक मुद्देतीन रुग्ण आणि संशय आल्याने स्वत:हून दोघे वायसीएम रुग्णालयात दाखलकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज झाली असून जाहिर

पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या पाच संशयितांपैंकी तीन पुरुषांच्या घश्यातील द्रवाचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आले नाहीत, असे वैद्यकीय विभागाचे मत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा सामना करण्यासाठी तयारी केले आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील माहितीसाठी सारथी हेल्पलाईनच्या ८८८८००६६६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. तसेच महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या असून नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज बैठका घेतल्या. उपाययोजनांबाबत बैठक झाली. महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, झामाबाई बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आदी उपस्थित होते.

...............................

दोघांचे अहवाल निगेटिव्हआयुक्त म्हणाले, दुबईतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तीन रुग्ण आणि संशय आल्याने स्वत:हून दोघे वायसीएम रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी दुबईवरुन आलेल्या तीन पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, दोघांचे अहवाल निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडले आहे.

 .......................................

नावे ठेवणार गोपनीयकोरोनाबाधितांची नावे गोपनीय ठेवण्यात यावीत. त्यांच्या कुटुबियांची माहिती प्रसारित करु नये  कोरोना बाधितांच्या चारतासापेक्षा जास्त संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांच्या नमुण्यांची तपासणी सुरु केली आहे. परदेशातून  शहरात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे..............................

महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्दकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज झाली असून जाहिर कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे. महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यापुढे महापालिका एकही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाही. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येणारे खासगी कार्यक्रम पुढे ढकलावेत, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

...........................

* अशी आहे व्यवस्था......महापालिकेच्या वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर, सात खासगी रुग्णालयात साठ आयसोलशन बेड उपलब्ध केले आहे.  भोसरीतील रुग्णालयात साठ बेडचे विलगीकरण कक्ष तयार केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु केली असून गुरूवारी संध्याकाळपर्यंत चाळीस बेड तयार केले जातील.  उर्वरित बेड उद्या तयार केले जाणार आहेत. याशिवाय पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात साठ बेड तयार आहेत. त्यातील २० बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत...................................

* अशी घ्यावी काळजीपिंपरी-चिंचवड मधील नागरिकांनी घाबरुन न जाता वैयक्तीक काळजी घ्यावी. हस्तांदोलन टाळावे, खोकताना तोंडाला रुमाल धरावा. सर्दी, खोकल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सुचनांनुसार तपासणी करुन घ्यावी, खोकला, सर्दी असल्यास  घरात बंदिस्त रहावे.   तसेच राज्य सरकारच्या १०४ या हेल्पलाईनवर देखील माहिती मिळेल. मास्क कोणी वापरायाचा हे वैद्यकीय विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्यानुसारच मास्कचा वापर करावा. तंदुरुस्त असणा-यांनी मास्कचा वापर करणे टाळावे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर