शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 16:00 IST

प्रकाश आंबेडकर अधूनमधुन आरक्षणाविरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहेत : खासदार निलेश राणे

ठळक मुद्देदुध दरवाढीबाबत शेतकऱ्यांची मागणी न्याय असेल तर स्वाभिमान पक्ष शेतकऱ्यांच्या मागे संभाजी भिडे यांच्याशी माझा कधीही संबंध आला नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणार नाही

पुणे : मराठ्यांना आरक्षण मिळू नये किंवा त्याला विलंब लागावा म्हणून प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत. अधूनमधुन आरक्षणाविरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांचा जर आरक्षणाला विरोध नसेल तर पाठिंबा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात राहता येणार नाही, असा इशारा स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. राणे यांनी पुण्यात सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना भारिप बहुजन महासंघाचे अध्य क्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी नारायण राणे यांच्यासह मराठा समाजातील अनेक नेते, कार्यकर्ते संघर्ष करत आहेत. तर आंबेडकरांकडून राणे समितीच्या अहवालावर चुकीची वक्तव्य केली जात आहेत.राज्य सरकार आणि आयोगाच्या पातळीवर आरक्षणाचा विषय असताना आंबेडकरांनी यामध्ये उडी का घेतली? आरक्षण हा आमचा हक्क आहे, भीक नाही. त्यांना आम्हाला शिकवू नये. त्यांना आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागेल, अन्यथा महाराष्ट्रात राहता येणार नाही. आरक्षण मिळू नये म्हणून सुरू असलेला त्यांचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. दुधदरवाढीवर बोलताना राणे म्हणाले, खासदार राजु शेट्टी अनेक आंदोलने करतात. दुध दरवाढीबाबत शेतकऱ्यांची मागणी न्याय असेल तर स्वाभिमान पक्ष शेतकऱ्यांच्या मागे उभा राहील. या मागणीबाबत सरकार दरबारी चर्चा व्हायला हवी. संभाजी भिडे यांच्याशी माझा कधीही संबंध आला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कोणत्याही वक्तव्याविषयी बोलणार नाही, असे सांगत राणे यांनी भिडे यांच्याविषयी बोलण्याचे टाळले. दरम्यान, कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाकडून पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेNilesh Raneनिलेश राणे Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmarathaमराठाreservationआरक्षण