बांगलादेश युद्धातील मोहिमा अनेक पिढ्यासाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST2020-12-17T04:37:40+5:302020-12-17T04:37:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिण मुख्यालयाच्या अधिपत्याखाली भारतीय लष्कराच्या तुकडीने १९७१ साली विविध मोहिमांमध्ये मिळविलेले यश हे येणाऱ्या ...

बांगलादेश युद्धातील मोहिमा अनेक पिढ्यासाठी प्रेरणादायी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दक्षिण मुख्यालयाच्या अधिपत्याखाली भारतीय लष्कराच्या तुकडीने १९७१ साली विविध मोहिमांमध्ये मिळविलेले यश हे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आजही देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी
मुख्यालय सज्ज आहे, असा विश्वास लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी व्यक्त केला.
भारतीय लष्कराने १९७१ साली पाकिस्तानविरोधात लढलेल्या लढाईला १६ डिसेंबर रोजी ४९ वर्षे पूर्ण झाले. याच दिवशी पाकिस्तानला पराभव स्वीकारत ९३ हजार
सैनिकांसह शरणागती पत्करली. तर याच युद्धामुळे आशिया खंडाचा भूगोल बदलत बांग्लादेश या नवीन देशाची निर्मिती झाली.
याप्रसंगी दक्षिण मुख्यालयातर्फे पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या युद्धातील शहीद जवानांना मानवंदना दिली.
मुख्यालयाचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. आहुजा यांनी पुष्पचक्र अर्पण करत शहीदांना श्रद्धांजलि अर्पण केली. कोरोनामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्तीतीत हा सोहळा पार पडला. यावेळी या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेलेले माजी सैनिक, वीरपत्नी यांनी सहभाग घेत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
फोटो : राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे १९७१ च्या युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहताना दक्षिण मुख्यालयाचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. आहुजा.