काळ्या काचांच्या विरोधात मोहीम

By Admin | Updated: April 28, 2017 06:01 IST2017-04-28T06:01:43+5:302017-04-28T06:01:43+5:30

वाहनांच्या काळ्या काचा काढून टाकाव्यात अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचना देऊनही त्याचे पालन वाहनचालकांनी न केल्यामुळे

Campaign against black glasses | काळ्या काचांच्या विरोधात मोहीम

काळ्या काचांच्या विरोधात मोहीम

पुणे : वाहनांच्या काळ्या काचा काढून टाकाव्यात अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचना देऊनही त्याचे पालन वाहनचालकांनी न केल्यामुळे अखेर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, वाहनांच्या काळ्या काचांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये १४०४ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, काचांच्या काळ्या फिती काढून टाकण्यात आल्या. यामध्ये २ लाख ८५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहनांच्या काचांना काळ्या फिती लावण्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत बंदी आहे.

Web Title: Campaign against black glasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.