उपासमारीने बछड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:32+5:302021-02-05T05:05:32+5:30

पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याजवळ राहत असलेले ग्रामपंचायत सदस्य सचिन आस्वारे यांच्या घराजवळ उसाचे क्षेत्र आहे. आज सोमवारी ...

Calf dies of starvation | उपासमारीने बछड्याचा मृत्यू

उपासमारीने बछड्याचा मृत्यू

पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याजवळ राहत असलेले ग्रामपंचायत सदस्य सचिन आस्वारे यांच्या घराजवळ उसाचे क्षेत्र आहे. आज सोमवारी सकाळी आस्वारे यांना कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने त्यांनी जाऊन पाहिले असता घराच्या भींतीच्या आडोशाला बिबट्या बछडा येऊन बसला होता. आस्वारे यांनी जवळच असणारे भीमाशंकर साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, विठ्ठल ढोबळे, साईदीप ढोबळे, दत्तात्रय अस्वारे, संदीप अस्वारे, उदय शेटिया, साहिल आत्तार, बाळासाहेब पाचारणे, अजित चव्हाण, शखिल शेख यांना बोलावले. त्यांनी कुत्र्यांना हुसाकावून लावत वनरक्षक सोपान अनासुने यांना बोलावून त्यांच्याकडे बिबट्याचा बछडा सुपुर्द केला. अनासुने हे त्या बछड्याला वैद्यकीय तपासणीसाठी काठापूर बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जात असताना मृत्यू झाला. पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. नागेश पुरी यांनी मृत बछड्याचे शवविच्छेदन केले असून तो अंदाजे दोन महिने वयाचा आहे. आईपासून ताटातुट झाल्यामुळे त्याच्या पोटात चारपाच दिवसांपासून काहीच गेले नसल्यामुळे उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. नागेश पुरी यांनी सांगितले.

--

Web Title: Calf dies of starvation