महापालिकेत केबिनवर वारेमाप खर्च

By Admin | Updated: June 27, 2014 00:31 IST2014-06-27T00:31:35+5:302014-06-27T00:31:35+5:30

एका बाजुला महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा (बजेट) उत्पन्नात कमी मिळण्याची शक्यता आहे.

Cabiner Waremap Expenditure in Municipal Corporation | महापालिकेत केबिनवर वारेमाप खर्च

महापालिकेत केबिनवर वारेमाप खर्च

>पुणो : एका बाजुला महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा (बजेट) उत्पन्नात कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील अनेक विकास कामांना कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी महापालिकेतील पदाधिकारी व अधिका-यांच्या कार्यालयावर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. 
महापालिकेत दरवर्षी विषय समितींच्या पदाधिका-यांची निवड होते. तर काही पदाधिका-यांची नव्याने नियुक्ती केली जाते. मग, नवीन माननीय आपल्या कल्पनेप्रमाणो कार्यालयाची रचना करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. त्याठिकाणी नेत्यांचे फोटो लावले जातात.  महापालिकेतील सत्ता परिवर्तन व नवनियुक्तीमुळे चार वर्षात पदाधिका-यांच्या कार्यालयाच्या नुतनीकरणा पोटी तब्बल 4क् लाख रुपये खर्च झाला आहे. 
महापौर आणि उपमहापौरांची निवड साधारण सव्वा ते अडीच वर्षाने होते, तर विषय समित्यांच्या अध्यक्षांची निवड एक वर्षाने होत असते. परंतू पदाधिकारी बदलला की कार्यालयामध्ये तातडीने दुरूस्तीची कामे केली जातात. नवीन पदाधिका-यांच्या आवडीनुसार रंगरंगोटीपासून खुच्र्या, टेबल, पडद्यांसाठी वारेमाप खर्च केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cabiner Waremap Expenditure in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.