शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

घरफोड्या करणाऱ्यांना अटक, 11 लाखांचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 02:09 IST

२० गुन्हे उघड : ११ लाखांचे सोने जप्त; खंडणीवरोधी पथकाची कारवाई

पुणे : कुलूपबंद सदनिका हेरून भरदिवसा घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लंपास करणाºया सराइताला त्याच्या साथीदारासह खंडणीविरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले असून त्याच्याकडून शहरात दाखल असलेले एकूण २० गुन्हे उघडकीस आणले आहेत.

निखिल ऊर्फ माँटी दत्तात्रय कंगणे (वय २४, रा. आनंदनगर, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) त्याचे नाव आहे. तर अमोल रघुनाथ गोपकर (वय २८, रा. भीमशक्तीनगर, स्पाईन रोड, चिखली) असे त्याच्या अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव आहे. दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी शहरात हडपसर, चंदननगर, येरवडा, विमानतळ, वानवडी, फरासखाना, सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे माळवाडी तसेच निगडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी ११ लाखांचे सोने तसेच चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़ त्याने मागील ३ वर्षात कुलूपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या असून त्यातील १८ गुन्हे भरदिवसा केले आहेत. पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली होती़ त्यानंतर तो तळेगाव ढमढेरे येथे राहायला गेला होता़ त्यामुळे तो पोलिसांच्या नेहमीच्या चेकिंगमध्ये आढळून येत नव्हता़ त्याने चोरलेले दागिने त्याने घरातील बेडच्या पाईपमध्ये लपवून ठेवले होते. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी अविनाश मराठे, पांडुरंग वांजळे, रमेश गरूड, उदय काळभोर, एकनाथ खंदारे, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदीप शिंदे, संतोष मते, सचिन कोकरे, धीरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, शिवानंद बोले, हनुमंत गायकवाड, नारायण बनकर, प्रकाश मगर आदीच्या पथकाने केली.याबाबत पोलीस उपायुक्तशिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, दरोडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी माहिती दिली़खंडणीविरोधी पथकातील कर्मचारी अमोल पिलाने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निखिल कंगणे हा साथीदारासह सोन्याचे दागिने विकण्यासाठी हडपसरगाव येथील गांधी चौकात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि निखिल व अमोल यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीThiefचोर