शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धास्तीने पुण्यातील आडते बाजार बंदावर ठाम; बैठकीत कोणताही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:10 IST

पुणेकरांची अडचण ? आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष

ठळक मुद्दे आडत्यांनी बाजार 31मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

पुणे: कोरोना च्या धास्तीने भाजीपाला,फळे आणि कांदा व बटाटा मार्केट तसेच भूसार व गूळ बाजार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आडते व व्यापारी यांनी घेतला आहे. हा बंद मागे घेण्यासाठी मंगळवारी (दि.24) रोजी बाजार समिती प्रशासनाने संबंधित सर्वांची बैठक घेतली. दोन तास चालेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आडते व व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यामुळे आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.पुण्यातील गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी विभागात दररोज शेतकरी , विक्रेते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी असते. यामुळेच आडत्यांनी बाजार 31मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून बाजार बंद करता येणार नाही असे राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने वारंवार जाहिर केले आहे. तसेच बाजार बंद ठेवला तर परवाने रद्द करण्यात येतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.  कोरोना मुळे संपूर्ण बाजार घटकांमध्ये प्रचंड धास्ती व भितीचे वातावरण आहे. यामुळे बाजार समिती प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी यांनी बैठक घेऊन देखील आडते बंदावर ठाम आहेत. याबाबत नागरिकांच्या सोयीसाठी बाजार समिती प्रशासनाने भाजीपाला वितरणाची सोय करावी, असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. तर आता पुढे काय करता येईल  व नागरिकांच्या सोयीसाठी काय नियोजन करायचे याबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीFarmerशेतकरीbusinessव्यवसाय