शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा स्मशानभूमीत मृत व्यक्तींच्या 'अस्थीं'चा सर्रास धंदा? पाषाणहृदयी कर्मचाऱ्यांचे प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 12:01 IST

अंत्यविधीसाठी दोन हजार तर अस्थींसाठी हजार रुपयांचा 'रेट'

ठळक मुद्देमहापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीत हा चिरीमिरीचा प्रकार सर्रास सुरू

लक्ष्मण मोरे

पुणे : 'मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे' ही म्हण प्रत्यक्षात अनुभवायची असल्यास महापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीला अवश्य भेट द्यावी. इथे चक्क अंत्यविधीसाठी लवकर नंबर लावण्याचे आणि 'अस्थी' सुपूर्द करण्याचे दर ठरलेले आहेत. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने दुःखात असलेल्या नातेवाईकांना येथील पाषाणहृदयी कर्मचारी मात्र चिरीमिरीसाठी त्रास देत आहेत.

महापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीत हा प्रकार सर्रास सुरू असून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याकडे डोळेझाक केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही ठराविकच स्मशानभूमीत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी केले जातात. येरवडा स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यविधी होत आहेत. या स्मशानभूमीत मृतदेहांना वेटिंगवर थांबून राहावे लागत आहे. याठिकाणी पालिकेचे आणि कंत्राटी पद्धतीने नेमलेले कर्मचारी काम करीत आहेत. स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी रांगेत उभ्या असलेल्या नातेवाईकांना लवकर नंबर लावून देण्यासाठी पैशांची मागणी करतात. तसेच, अंत्यविधी झाल्यानंतर नातेवाईकांना अस्थी देण्यासाठीही पैशांची मागणी केली जाते.आधीच नातेवाईकांच्या मृत्यूमुळे आणि कोरोनाची बाधा झाल्यामुळे दुःखात असलेल्या नातेवाईकांना नाडण्याचे काम या स्मशानभूमीत सुरू आहे. दुःखात असलेले नातेवाईक वाद घालण्यापेक्षा वेळ जाऊ नये म्हणून पैसे देऊन निघून जातात. कोरोनासारख्या कठीण काळात अनेकांना पैसे खाण्याची संधी दिसू लागली असून माणुसकीला काळिमा फासणारे हे प्रकार राजरोसपणे घडत असताना पालिकेचे वरिष्ठ अधिकारी मात्र डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.----------अभिजित साबळे यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई-वडील, लहान भाऊ रुग्णालयात उपचार घेत असून पत्नी गृह विलगीकरणात आहेत. दुर्दैवाने खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या आईचे सोमवारी निधन झाले. त्यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक येरवडा स्मशानभूमीत संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्यविधीसाठी गेले. त्यांचा रात्री साडेनऊच्या सुमारास नंबर आला. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांना भेटून लवकर नंबर लावण्याकरिता पैशांची मागणी केली. अंत्यविधी झाल्यानंतर अस्थी घ्यायला गेलेल्या नातेवाईकांना पुन्हा एक हजार रुपये मागण्यात आले. ----------आईच्या मृत्यूचे दुःख, कुटुंबावर आलेले कोरोनचड संकट यामुळे मी तणावाखाली आहे. एकीकडे मृत्यू झालेल्या आईचा शेवटी चेहराही पाहता आला नाही की तिला शेवटचे पाणीही पाजता आले नाही. एवढी सल आणि वेदना मनात घेऊन विधी पार पाडत असतानाच येरवडा स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांनी अंत्यविधी आणि अस्थींसाठी पैसे मागितल्यामुळे आणखीनच वेदना झाल्या. माणुसकी आणि संवेदनाहीन कारभार अनुभवास आला. - अभिजित साबळे-  -----------येरवडा स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे लुटण्यात येत आहेत. अंत्यविधीसाठी दोन हजार आणि अस्थींसाठी एक हजार रुपये मागितले जात आहेत. अडले-नडलेले, दुःखात असलेल्या नातेवाईकांच्या मन:स्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. असंवेदनशीलपणे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.- अमोल आहेर पाटील, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :YerwadaयेरवडाDeathमृत्यूFamilyपरिवारfraudधोकेबाजी