शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बसना अपघाताचा धोका

By admin | Updated: August 12, 2015 04:36 IST

दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बसला हवेचा स्वतंत्र सिलिंडर नसल्याने ब्रेकवर ताण येतो. त्यामुळे बऱ्याचदा बसचा ब्रेक लागत नाही. याबाबत बसचालकांनी पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

पुणे : दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बसला हवेचा स्वतंत्र सिलिंडर नसल्याने ब्रेकवर ताण येतो. त्यामुळे बऱ्याचदा बसचा ब्रेक लागत नाही. याबाबत बसचालकांनी पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, एखादा अपघात घडल्यानंतरच पीएमपी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.शहरातील बीआरटी मार्गावर चालविण्यासाठी दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बस घेण्यात आल्या आहेत. तसेच ठेकेदाराकडून काही बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. सध्या चालू असलेल्या बीआरटी मार्गावर बसच्या उजव्या बाजूचे दरवाजे उघडले जात नव्हते; मात्र संगमवाडी ते विश्रांतवाडी हा बीआरटीचा मार्ग सुरू होत आहे. या मार्गावर बसच्या उजव्या बाजूचे दरवाजे उघडले जाणार आहेत. उजव्या बाजूचा दरवाजा उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी हवेचा स्वतंत्र सिलिंडर बसविणे आवश्यक आहे. तसे टेंडरमध्येही नमूद करण्यात आले होते; मात्र ६५० बसना हा स्वतंत्र सिलिंडर बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे बसमध्ये असलेल्या एकाच सिलिंडरवर ताण येऊन ब्रेकवर परिणाम होत नाही. एकाच सिलिंडरवरून बसच्या दरवाजांची उघडझाप झाल्यास ब्रेकची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या बसना दरवाजे उघडण्यासाठी स्वतंत्र सिलिंडर बसविण्याची मागणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हृषीकेश बालगुडे यांनी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)