शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
4
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
5
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
6
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
7
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
8
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
9
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
10
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
11
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
12
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
13
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
14
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
15
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
16
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
17
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
18
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
19
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
20
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
Daily Top 2Weekly Top 5

हँडब्रेक असूनही बस सरकली: नऱ्हेगावात पीएमपीएमएल बसचा अनियंत्रित अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 23:53 IST

​पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी  अकरा वाजण्याच्या सुमारास नऱ्हेगावात घडली. ...

​पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी  अकरा वाजण्याच्या सुमारास नऱ्हेगावात घडली. नऱ्हेगाव-शिवाजीनगर मार्गावरील पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH-12-SF-0720 ही भैरवनाथ मंदिराजवळील शेवटच्या बसस्टॉपवर उभी असताना, चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि बसच्या संभाव्य तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित होऊन महावितरणच्या डीपीवर धडकली. या घटनेमुळे पीएमपीएमएल प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

​मंगळवारी सकाळी ही बस नेहमीप्रमाणे शेवटच्या थांब्यावर उभी होती. बसचा चालक क्षणभरासाठी खाली उतरला. चालकाने 'हँडब्रेक' लावल्याचा दावा केला असतानाही, बस अचानक पुढे सरकू लागली. हँडब्रेक असूनही बस सरकल्यामुळे बसमध्ये असलेले अंदाजे ६ ते ७ प्रवासी भयभीत झाले आणि एकच घबराट उडाली. बसने रस्त्याच्या कडेला वेग घेतला आणि थेट महावितरणच्या एका मोठ्या ट्रान्सफॉर्मर डीपीवर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बसची पुढील काच पूर्णपणे फुटली आणि बसचे मोठे नुकसान झाले. तसेच डीपी लगत असणाऱ्या ओम साई ज्वेलर्स तसेच स्वरा लेडीज टेलरच्या डिजिटल बोर्डाचेही नुकसान झाले. 

​सुदैवाने, ही घटना घडण्याच्या काही सेकंद आधीच एक दुचाकी आणि एक रिक्षा त्या ठिकाणाहून पुढे गेली होती. जर बस त्याच वेळी अनियंत्रित झाली असती, तर मोठा जीवितहानीचा अनर्थ घडला असता. यामुळे प्रवाशांचा आणि परिसरातील नागरिकांचा श्वास रोखला गेला होता.​पीएमपीएल प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट...​नऱ्हेगावात घडलेल्या या घटनेने पीएमपीएमएलच्या कारभारावर आणि बसच्या देखभाल दुरुस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चालकाने हँडब्रेक लावला असतानाही बस पुढे सरकते याचा अर्थ एकतर चालकाचा निष्काळजीपणा खूप मोठा आहे, किंवा बसच्या ब्रेक यंत्रणेत गंभीर तांत्रिक दोष आहे.​नागरिकांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ही घटना केवळ अपघात नाही, तर पीएमपीएमएल प्रशासनाच्या गलथान कारभाराचा आणि 'तडजोड' केलेल्या सुरक्षेचा परिणाम आहे.​ पीएमपीएल प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा बसच्या 'रस्त्यावर' असण्याला जास्त महत्त्व देत आहे. जीर्ण झालेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेल्या गाड्या रस्त्यावर धावून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत.

​पीएमपीएमएल प्रशासनाने या अपघाताची केवळ 'चालकावर कारवाई' करून बोळवण न करता, तातडीने संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सर्व बसेसच्या ब्रेक सिस्टीमची तातडीने तपासणी मोहीम हाती घ्यावी, अन्यथा भविष्यात असे जीवघेणे अपघात टाळणे शक्य होणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Handbrake fails, bus crashes in Narhegaon; PMPML negligence alleged.

Web Summary : In Narhegaon, a PMPML bus, despite the handbrake, rolled and crashed into an electric transformer due to suspected mechanical failure. Passengers panicked as the bus struck, damaging property. Public outrage mounts over PMPML's negligence and compromised safety standards.
टॅग्स :Accidentअपघात