शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

पुणे-सोलापूर मार्गावर बर्निंग बसचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:08 IST

कदमवाकवस्ती : लातूरवरून पुुुुुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. काही कळण्याच्या आत संपूर्ण ...

कदमवाकवस्ती : लातूरवरून पुुुुुण्याला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. काही कळण्याच्या आत संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली. बसमध्ये जवळपास २९ प्रवासी होते. चालकाच्या प्रसंगावधनामुळे ते वेळीच बस बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेमुळे प्रवाशांना काळ आला होता, पण वेळ नाही या म्हणीचा प्रत्यय आला. ही घटना शनिवारी सकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती जवळील वाकवस्तीजवळ येथे ८ च्या सुमारास घडली. अग्निशामक दलाला अर्ध्या तासानंतर आग विझवण्यास यश आले.

लातूर जिल्ह्यातील मुखेडहून पुण्याला जाण्यासाठी शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी ७ च्या सुमारास स्वाती ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे रवाना झाली होती. यात ११ महिलांसह २९ प्रवासी होते. ही बस शनिवारी (दि २६) सकाळी ७ च्या सुमारास उरुळी कांचनजवळ बंद पडली. यावेळी बस चालक बाबूराव विनायक मुंडे यांच्या छोट्याशा प्रयत्नानंतर बस चालू झाली. ही बस लोणी काळभोरहून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिराजवळ येताच, बसचा उजव्या बाजूचा मागील टायर फुटला. टायर फुटताच टायरने पेट घेतला. टायरने पेटल्याचे लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या बाजूला घेत बसमधील प्रवाशांना त्वरित खाली उतरवले. प्रवासी बसमधून उतरत असतानाच, बसनेही मागील बाजूने पेट घेतला. बसमधील प्रवाशी उतरले असले तरी, प्रवाशांचे खाण्यापिण्याचे साहित्य व सामान जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांसह वाघोली व हडपसर येथील अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर,

महामार्ग पोलीसचे युवराज नांद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊऩ, बसमधील प्रवाशांना धीर देण्याबरोबरच प्रवाशांना त्यांच्या घऱी जाण्यासाठी मदत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.

चौकट

चालकामुळे वाचले २९ जणांचे प्राण

उरुळी कांचन येथे बस बंद पडल्यावर चालकाने ती दुरुस्त केली. ही बस कमवाकवस्ती हद्दीत आल्यावर बसचे चाक अचानक फुटल्याने टायरने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालकाने त्यांना त्वरित खाली उतरवले. मात्र, प्रवासी उतरतानाच बसने मागच्या बाजूने पेट घेतला. जर वेळीच प्रवासी खाली उतरले नसते, तर मोठी जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेत प्रवाशांच्या सामानाचे नुकसान झाले.

फोटो : आगीत भस्मसात झालेली ट्रॅव्हल बस.