शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन गडकिल्ल्यांऐवजी रेशीमबागेच्या मुख्यालयात करावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 13:31 IST

मनसेकडून रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियात आहेत. त्यावरुन, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देखरे तर मेल्यानंतर वैर संपते. ब.मो पुरंदरेंनी छ. शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंची बदनामी केली आहे.

मुंबई - इतिहासकार, नाटककार, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. पुण्यातील रुग्णालयात वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसाधनेचा ध्यास घेत तोच वसा आयुष्यभर जपला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच, बाबासाहेब मला पितृतुल्य होते, असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर, मनसेनं बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीचं विसर्जन 11 किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त माध्यमात आहे. त्यावरुन, अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही यावरुन खोचक शब्दात टीका केली आहे. मात्र, मनसेनं हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलंय. 

मनसेकडून रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियात आहेत. त्यावरुन, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गड-किल्ले ही स्मशानभूमी नाही, नवा पायंडा पाडू नये, अशा शब्दात सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मनसेच्या या अनेकांनी निर्णयाला थेट विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही ट्विट करुन मत व्यक्त केलंय. त्यामध्ये, त्यांनी आरएसएसच्या रेशीमबागेत या अस्थीचं विसर्जन करण्याचं सूचवलं आहे.  खरे तर मेल्यानंतर वैर संपते. ब.मो पुरंदरेंनी छ. शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंची बदनामी केली आहे. ब.मो.पुरंदरेंच्या अस्थी विसर्जन गडकिल्यांवर करण्यापेक्षा रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात करावे. छत्रपतींचे गडकिल्ले आम्हां बहुजनांना प्रेरणा देतात, असे ट्विट रविकांत वरपे यांनी केले आहे. 

सोशल मीडियातील वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे. मनसेचे राज्य सचिव आणि प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, अशा प्रकारे कुठल्याही किल्ल्यावर अस्थीचे विसर्जन करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे नेणार

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शिवशाहिरांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच मनसेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी तसेच बाबासाहेब पुरंदरेप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी शिवशाहीर पुरंदरेंच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मनसे करणार असल्याची माहितीही पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस