शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

काटेवाडीमध्ये घरफोडी, दोन लाखाचा ऐवज लंपास; चोरी सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 19:12 IST

भर लोकवस्तीत घरफोडीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थ भयभीत...

काटेवाडी (पुणे): येथे शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्याने एक घर व किराणा दुकानाचे कटावणीने कुलूप तोडून जवळपास दोन लाखांच्या ऐवज लंपास केला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेवाडीतील पालखी ओटा शेजारी असलेल्या संतोष सुभाष काटे यांचे किराणा दुकान व अरुणा भीमराव जाधव यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिनेसह रोख रकम असा दोन लाखांच्या आसपास ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. 

अरुणा जाधव यांच्या घराचा दरवाज्याचे कटावणीने कूलूप तोडून चोरट्याने घरातील पेटीमध्ये असणारी सोन्याची बोरमाळ, तसेच सोन्याचे गंठण, जुबे फूले,  आदि सोन्याचा ऐवज व पाच हजार रुपये रोख रक्कम, असे एक लाख सत्यानऊ हजारहून जास्त रक्कमेचा ऐवज लंपास केला आहे. 

या घटनेने काटेवाडी परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जवळच्या इमारतीवर सी.सी. टी.व्ही असल्याने ही घरफोडीची घटना यामध्ये दिसून आली. रात्रीच्या साडे बाराच्या दरम्यान हातात कटावणी व डोक्यावर हेल्मेट घातलेली एकच व्यक्ती आढळून आली. मात्र चोरीच्या परिसरात अंधार असल्याने सदरची व्यक्ती स्पष्ट दिसत नाहीये. भर लोकवस्तीत घरफोडीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी