घोडेखल येथे जेसीबीच्या साह्याने घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST2021-05-23T04:11:00+5:302021-05-23T04:11:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील घोडेखल येथे जेसीबीच्या साह्याने घरफोडी करून अंदाजे १७ लाखांचा चोरी केली ...

Burglary with the help of JCB at Ghodekhal | घोडेखल येथे जेसीबीच्या साह्याने घरफोडी

घोडेखल येथे जेसीबीच्या साह्याने घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील घोडेखल येथे जेसीबीच्या साह्याने घरफोडी करून अंदाजे १७ लाखांचा चोरी केली असल्याची तक्रार मिहीर राजू दुधाट यांनी वेल्हे पोलिसात केली आहे. यासंबंधीचा तक्रार मिहीर दुधाट यांनी वेल्हे पोलिसांत दिली आहे

घोडेखल येथे गट क्रमांक ६४ व ६५ मध्ये दुधाट यांच्या घराचे आरसीसी बांधकाम केले होते. शनिवारी (दि.१५) दुधाट यांचा मित्र मंगेश देशपांडे यांनी दूरध्वनीवरून चोरी झाल्याची माहिती दुधाट यांना दिली. यानंतर दुसऱ्या दिवशी (दि.१६) सकाळी साडेआठ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांना घर जेसीबीच्या साह्याने फोडलेले दिसले. त्यांना घरातील एलसीडी टीव्ही, सोलर पावर बॅटरी, पावर टूल्स, पेट्रोल जनरेटर तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक्स स्वयंपाकाचे साहित्य आणि ५० हजार रुपये रोख इतर अजून मौल्यवान वस्तू असा १७ लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे आढळले.

Web Title: Burglary with the help of JCB at Ghodekhal