मंचर शहरात भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:15 IST2021-08-27T04:15:09+5:302021-08-27T04:15:09+5:30
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता उत्तम पवार यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. पवार यांची नक्षत्र रेसिडेन्सी येथे सदनिका ...

मंचर शहरात भरदिवसा घरफोडी
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता उत्तम पवार यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. पवार यांची नक्षत्र रेसिडेन्सी येथे सदनिका असून त्यांची सदनिका क्रमांक ३०३ ही बंद होती. बुधवारी दुपारनंतर चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बंद सदनिकेच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा कशानेतरी उचकटून आत प्रवेश केला. पवार यांच्या कपाटातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तसेच दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेऊन घरफोडी केली आहे. तसेच शेजारी राहणारे घेवरचंद काशिनाथ भाईक, सागर प्रकाश काजळे यांच्या घरातही चोरीचा प्रकार झाला आहे. सागर काजळे यांच्या सदनिकेत मौल्यवान ऐवज नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. कविता पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.