शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

कामाच्या वेळेत झोपा काढणार्‍या अन् दारू पिऊन कामावर आलेल्या कर्मचार्‍यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:45 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी तरकारी विभागात कामाच्या वेळी झोपा काढणार्‍या तीन व दारू पिऊन कामावर आलेल्या तळीराम कर्मचार्‍यांचे थेट निलंबन केले. तर २३ तोलणारांना उशिरा कामावर आल्याने नोटिसा दिल्या.

ठळक मुद्देआता कामचुकारपणा करणार्‍यांची ‘खैर’ केली जाणार नाही, असा कारवाईतून संदेशबाजार समिती कार्यालयात तक्रार निवारण पेटीची व्यवस्था

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी बाजारातील यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी रविवारी पहाटे तीन वाजता  कोणताही लवाजमा बरोबर न घेता अचानक हजेरी लावली. या वेळी तरकारी विभागात कामाच्या वेळी झोपा काढणार्‍या तीन व दारू पिऊन कामावर आलेल्या तळीराम कर्मचार्‍यांचे थेट निलंबन केले. तर २३ तोलणारांना उशिरा कामावर आल्याने नोटिसा दिल्या. नियमांचे उल्लंघन करणार्‍या अडत्यांनादेखील त्यांनी कडक समन्स बजावला. आता कामचुकारपणा करणार्‍यांची ‘खैर’ केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.  पुणे विभागासह राज्य आणि परराज्यातून रात्रीपासूनच मार्केट यार्डातील विविध विभागात माल येण्यास सुरुवात होते. प्रत्यक्ष व्यवहार पहाटे सुरू होतात. मात्र हे सर्व व्यवहार कर्मचारी आणि बाजारातील घटकांच्या नियोजनावर अंवलबून असतात. बरेचसे नियोजन रात्रपाळीचे कर्मचारी आणि पहाटे कामावर रुजू होणार्‍या तोलणारांवर अवलंबून असते. बाजार आवारातील कर्मचारी आणि संबंधित घटकांना दिलेली जबाबदारी पार पाडली जात आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी खैरे यांनी अचानक पहाटे बाजारात हजेरी लावली. त्यात तीन कर्मचारी कामावर असताना झोपल्याचे निदर्शनास आले. तर एक कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वाहने सोडत असल्याचे आढळले. या चार कर्मचार्‍याचे आठवडाभरासाठी निलंबन केले. २३ तोलणारांनी कामावर अर्ध्या तासाने हजेरी लावली. त्यामुळे त्यांनाही समन्स देण्यात आले. तसेच गेट क्रमांक एक ते गणेश मंदिरापर्यंतचे व्यापारी दहा फुटाचा नियम पाळत नसल्याने त्यांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  काही अडते पट्टीपेक्षा अधिकचे पैसे घेत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केल्या आहेत. त्याची तपासणी खैरे यांनी केली. अडते पट्टीपेक्षा अधिकचे पैसे कापत असतील, तर त्यास सत्यता आढळल्यास संबंधित अडत्यांवर परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. तरकारी विभागातील व्यवहार दुपारी एक, तर फळे विभागातील व्यवहार दुपारी दोननंतर सुरू राहिल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी कर्मचार्‍याच्या संख्येत वाढ करण्यात आली असल्याची माहितीही दिलीप खैरे यांनी सांगितली. 

 

अडचणी व समस्यांसाठी तक्रार पेटी बाजार परिसरासंदर्भात शेतकरी, ग्राहक, व्यापारी तसेच अडत्यांसह इतर घटकांच्या काही तक्रारी असतील. तसेच काही सूचना असतील, तर त्यासाठी बाजार समिती कार्यालयात तक्रार निवारण पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधितांनी तक्रार अथवा सूचना लेखी स्वरूपात या तक्रार पेटीत टाकाव्यात. या पेटीत जमा होणार्‍या तक्रारी सोडविण्याचा, तसेच सूचनांचे पालन करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.- दिलीप खैरे, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती 

टॅग्स :MarketबाजारPuneपुणे