शिरूर तालुक्यात होणार बैलगाडा शर्यती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST2021-08-23T04:15:03+5:302021-08-23T04:15:03+5:30

झरे गावात ज्याप्रमाणे बैलगाडा मालकांच्या सन्मानार्थ बैलगाडा शर्यत भरवली, त्याप्रमाणे आता शिरूर तालुक्यातही बैलगाडा शर्यत भरवली जाणार आहे. आमदार ...

Bullock cart race will be held in Shirur taluka | शिरूर तालुक्यात होणार बैलगाडा शर्यती

शिरूर तालुक्यात होणार बैलगाडा शर्यती

झरे गावात ज्याप्रमाणे बैलगाडा मालकांच्या सन्मानार्थ बैलगाडा शर्यत भरवली, त्याप्रमाणे आता शिरूर तालुक्यातही बैलगाडा शर्यत भरवली जाणार आहे. आमदार पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीबाबत जसे आंदोलन उभे केले, तसेच आंदोलन शिरूर तालुक्यात देखील उभे करणार आहोत. आणि खुद्द आमदार गोपीचंद पडळकर यांनीच शिरूर तालुक्यात देखील बैलगाडा शर्यत भरवा मी स्वतः घाटात उभा राहील” असे म्हटल्याने त्यामुळे येत्या दहा दिवसांत बैलगाडा शर्यतीबाबत ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर शिरूर तालुक्यातही गनिमी कावा करून बैलगाडा शर्यती भरवल्या जाणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ, हवेली आणि संपूर्ण पुणे जिल्हा ही बैलगाडा शर्यतीची पंढरी आहे. त्यामुळे या भागातील बैलगाडामालकांच्या भावना लक्षात घेऊन या भागात देखील आंदोलन सुरू करणार आहोत. जे गुन्हे दाखल व्हायचेत ते होऊ द्या, मात्र बैलगाडा शर्यती या होणारच असल्याचे देखील या वेळी शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Bullock cart race will be held in Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.