बंदी असतानाही पेठ येथे बैलगाडा शर्यती, संयोजकावर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:10+5:302021-02-05T05:04:10+5:30
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पेठ गावातील तळईचामळा येथे ...

बंदी असतानाही पेठ येथे बैलगाडा शर्यती, संयोजकावर गुन्हे दाखल
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पेठ गावातील तळईचामळा येथे असणाऱ्या गायरान जागेत बैलगाडा शर्यत चालू असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलीस नाईक विलास साबळे, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, पोलीस जवान सुदर्शन माताडे, पोलीस नाईक नाडेकर यांनी तत्काळ बैलगाडा घाटात जाऊन पाहणी केली असता काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बैलगाडा घाटात विनापरवाना काही लोक बैलगाडे पळवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना मज्जाव केला. तरीही लोकांनी बैलगाडा शर्यत घेणे थांबविले नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यत भरवणारे आयोजक व संयोजक सचिन दत्तात्रय होले (वय ३५), नीलेश सुभाष घुले (वय ३४, दोघेही रा. होलेवाडी, ता. खेड), दत्तात्रय धोंडीबा कंधारे (वय ५९, रा. पेठ, ता. आंबेगाव), व इतर पाच ते दहा बैलगाडामालकांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास मंचर पोलीस करत आहे.