शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा आंदोलन प्रकरण; आढळराव पाटील, महेश लांडगे आजी माजी आमदारांना न्यायालयाचे अटक वॉरट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:00 IST

मध्यंतरी शासनाने बैलगाडा मालक व आंदोलन कर्त्यावरील गुन्हे मागे घेणार म्हणून जाहीर केले होते. परंतु हा शासनाचा निर्णय न्यायालयापर्यंत पोहोचला नाही - दिलीप मोहिते पाटील

राजगुरुनगर: २०१७ मध्ये चाकण मध्ये बैलगाडा आंदोलन प्रकरणी ३२ जणांवर गुन्हे दाखल केले. न्यायालयात उपस्थित राहत नसल्यामुळे आजी माजी आमदार व बैलगाडा मालक यांना अटक वॉरट जारी करण्यात आले होते. दि. १४ रोजी सर्वजण अटक वॉरट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते.        चाकण येथे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले होते. या आंदोलनात चाकण चौकात रास्तारोको करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलिप मोहिते, बाळा भेगडे, राजेश जवळेकर यांच्यासह बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल केले होते. ते न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक वॉरट जारी केले होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलिप मोहिते बाळा भेगडे यांच्यासह बैलगाडा मालक यावेळी न्यायालयात अटक वॉरट रद्द करण्यासाठी आले होते. चाकण येथे सर्वपक्षीय आंदोलन बैलगाडे सुरू करावे या संदर्भात मोठे आंदोलन झाले होते. यावेळी पोलिसांनी माझ्यासह, सर्वपक्षीय पुढार्‍यांवर तसेच बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल केले होते. गेले सात आठ वर्ष याकडे दुर्लक्ष झाले. मध्यंतरी शासनाने बैलगाडा मालक व आंदोलन कर्त्यावरील गुन्हे मागे घेणार म्हणून जाहीर केले होते. परंतु हा शासनाचा निर्णय न्यायालयापर्यंत पोहोचला नाही. न्यायालयात अजूनही याबाबत खटला सुरू आहे. न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यामुळे आज न्यायालयात यावे लागले. असे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmahesh landgeमहेश लांडगेCourtन्यायालयBull Cart Raceबैलगाडी शर्यतPoliticsराजकारण