शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरकडून तब्बल ५० प्लॅटधारकांची फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:45 IST

टस्कॉन कन्स्ट्रो प्रा. लि. व एस. आर. डी. एच. बिल्डर्स कन्स्ट्रक्शन पिसोळी कंपनीची स्थापना करत त्यात फिर्यादींसह इतर ५० ते ६० जणांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

ठळक मुद्देफिर्यादींनी प्रकल्पात बी-१६ क्रमांकाचा रो हाऊस ५५ लाख रुपयांना बुक केला.

 पुणे : पिसोळी येथील एका गृहप्रकल्पात फ्लॅट घेणा-या तब्बल ५० जणांना बिल्डरने लाखो रुपयांना गंडा घालत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यासाठी बिल्डरने बनावट कंपनी देखील स्थापन केली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        अजित राजन कुलकर्णी (वय ३६, रा. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हेमंत तुकाराम बुद्धीवंत (महम्मदवाडी) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित कुलकर्णी हे मूळचे पुण्यातील असून ते नोकरीनिमित्त मुंबईत असतात. २०१५ मध्ये त्यांना पुण्यात घर घ्यायचे होते. त्यावेळी त्यांना टस्कॉन कन्स्ट्रो प्रा. लि. व एस. आर. डी. एच. बिल्डर्स पिसोळी येथे रोझ पॅरेडाईज नावाचा गृहप्रकल्प उभारणार असल्याची माहिती मिळाली होती. प्रकल्पाची त्यांनी साईटवर जाऊन माहिती घेतली. त्यावेळी त्यांना शंभर फ्लॅटचा हा गृहप्रकल्प असून, त्यातील ५० फ्लॅट बुक झाल्याचे सांगण्यात आले होते. साईट आवडल्याने त्यांनी प्रकल्पातील बी-१६ क्रमांकाचा रो हाऊस ५५ लाख रुपयांना बुक केला. त्याचे दहा लाख रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर २०१६ मध्ये सामंजस्य करार केला. बुकींग झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी फिर्यादी गृहप्रकल्पाकडे गेले. त्यावेळी तेथे कोणतेही काम सुरू नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत कंपनीच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले. परंतु, अनेक दिवसांनीही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यांनी बिल्डर हेमंत बुद्धीवंत यांच्याशी संपर्क साधला. मात्र, संपर्क झाला नाही. याप्रकरणी अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.....................बनावट कंपनीची स्थापना संबंधित जागा ही हेमंत बुद्धीवंत यांच्या नावावर नसून त्यांनी बनावट टस्कॉन कन्स्ट्रो प्रा.लि. आणि एस. आर. डि. एच. कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. त्याद्वारे रोझ पॅरेडाईज नावाचा बनावट गृहप्रकल्प तयार करून फिर्यादींसह इतर ५० ते ६० जणांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिस