बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST2021-02-11T04:13:38+5:302021-02-11T04:13:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने (ईडी) बुधवारी ...

Builder Avinash Bhosale | बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने (ईडी) बुधवारी कारवाई केली. या कारवाईत भोसले यांच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त करण्यात आली.

भोसले यांचे गणेशखिंड रस्त्यावर ‘एबीआयएल’ कार्यालय आहे. बुधवारी सकाळी मुंबईतील ईडी कार्यालयातील पथकाने तेथे कारवाई केली. सकाळी साडेआठपासून कारवाई सुरू होती. सहा वर्षांपूर्वी परदेश चलन व्यवहारात भोसले यांची चौकशी केली होती. त्यावेळी भोसले यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली होती. महिनाभरापूर्वी मुंबईतील ईडी कार्यालयात भोसले यांची चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी भोसले यांच्या कार्यालयावर कारवाई केली. या कारवाईत काही कागदपत्रे जप्त केली असून कारवाईबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

कागदपत्रे ताब्यात घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले. काही दिवसांपूर्वी भोसले यांच्या निकटवर्तीयांची ईडीकडून चौकशी केली होती.

Web Title: Builder Avinash Bhosale