शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे रेड्यांना जीवदान; एकावर सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 19:06 IST

देवीला बळी देण्यासाठी निर्दयपणे बांधून ठेवलेल्या दोन रेड्यांना प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार एकावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहकारनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रेड्यांची केली सुटकाकलम ११ (१) व कलम ५,६,७  नुसार गुन्हा दाखल

पुणे : देवीला बळी देण्यासाठी निर्दयपणे बांधून ठेवलेल्या दोन रेड्यांना प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रेड्यांची सुटका केली आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार एकावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीटर उर्फ संडू चकलेट पवार (वय ४५, रा. शनी मारुती मंदिराजवळ, धनकवडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. प्राणी जीवसेवा फाउंडेशनचे अमित शहा (रा. आदिनाथ सोसायटी, पुणे) यांना सहकारनगर येथील वनशिव वस्ती येथे फासे पारधी समाजाचे लोक दोन रेड्यांना बळी देण्यासाठी घेऊन आले असल्याची माहिती मिळाली. शहा सुमित तरटे व शामसुंदर आंधळे या इतर दोन प्राणिमित्रांसह तिथे आले. त्यामध्ये देवाचे फोटो होते आणि या तंबूसमोर हळदी कुंकू वाहिलेले आणि गळ्यात हार घातलेले दोन रेडे बांधले होते. हा सर्व प्रकार पाहून रेड्यांचे बळी देणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.पोलिसांनी तातडीने कारवाई करीत सदर ठिकाणावरून दोन रेड्यांना मुक्त केले. कोयता, कुर्‍हाड, दोरखंड, पातेली व बळी देण्यासाठी लागणारे इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ही सगळी तयारी करीत असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने हे रेडे मेसाई देवीला बळी देण्यात येणार असल्याचे सांगितले. या आरोपीविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंध कायद्यांतर्गत कलम ११ (१) व प्राणी संवर्धन अधिनियमांतर्गत कलम ५,६,७  नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पवार यास ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरु आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेPoliceपोलिस