शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: मध्यमवर्गावर सवलतींचा वर्षाव; पुण्यातील तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:21 IST

अर्थसंकल्पावर लोकसभा निवडणुकीचा प्रभाव

पुणे : मध्यमवर्गाला कर सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी देऊ केलेल्या विविध सवलती, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तिमाही करण्याची केलेली घोषणा, वन रँक वन पेन्शनचे दिलेले आश्वासन, गृह उद्योगाला चालना देणारे निर्णय या मुळे हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाला खूश करणारा असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कर सल्लागार चंद्रशेखर चितळे म्हणाले, गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा जय जवानचा नारा देणारा होता. यंदा निवडणुका डोळ््यासमोर ठेवून जयकिसान, जय कामगार आणि जय मध्यमवर्ग असा नाराच जणू अर्थसंकल्पातून दिला आहे. निवडणुकीपुर्वी संपूर्ण अर्थसंकल्प मांडायचा नसतो हा संकेत सरकारने पाळला नाही. मात्र, अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर वजावटीच्या माध्यमातून संपूर्ण करसवलत मिळविता येणार आहे. विक्री न झालेल्या घरांवर देखील पूर्वी कर आकारणी केली जात होती. त्याची मर्यादा आता एकवरुन दोन वर्षे केली आहे. त्याचा फायदा गृहउद्योगाला होईल.निवडणुकीपूर्वीच्या या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने कनिष्ठ, मध्यमवर्ग, शेतकरी आणि असंघटित कामगारांसाठी अनेक सवलती देऊ केल्या आहेत. जीएसटीच्या कररचनेतही बदलाचे संकेत देत छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्या अर्थसंकल्पामुळे ज्यांचे उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत असेल, त्यांना कर सवलतीचा लाभ मिळेल, असे ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले. सरकारने जीएसटी सुकर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा फायदा पाच कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यक्तींना होईल. त्यांना यापुढे त्रैमासिक जीएसटी भरण्याची सवलत मिळेल, असे सीए निशांत मुंदडा म्हणाले.देशातील कोणत्याची शहरामध्ये चारजणांचे कुटुंब पोसायचे असेल तर किमान ३० ते चाळीस हजार रुपये आवश्यक आहे. त्यामुळे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवायला हवी होती. देशात संपत्ती निर्माण होत आहे. मात्र, त्याचे वितरण तळागाळापर्यंत करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्या दृष्टीने दिशादर्शक असे अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी प्रतिक्रिया अर्थक्रांती संस्थेचे अनिल बोकील यांनी दिली.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Taxकर