दौंडला बसपाचा मोर्चा
By Admin | Updated: October 29, 2014 00:02 IST2014-10-29T00:02:17+5:302014-10-29T00:02:17+5:30
अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील जावखेड खालसा येथे जाधव कुटुंबीयाच्या हत्तेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

दौंडला बसपाचा मोर्चा
दौंड : अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील जावखेड खालसा येथे जाधव कुटुंबीयाच्या हत्तेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान हा मोर्चा शांततेत झाला.
या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करावी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच दलीत कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी जाहीर निषेध सभेत बहुजन समाज पार्टीचे दौंडचे अध्यक्ष किरण पोळ, मच्छिंद्र डेंगळे, यादव जाधव, योगेश कांबळे, विशाल सोनवणो, प्रकाश साबळे, उद्धव घोडके, प्रमोद गजरमल यांच्यासह अन्य कार्यकत्यार्ंनी केली आहे.
दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले असुन या निवेदनावर कार्यकत्र्याच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
4पुरोगामी महाराष्ट्रात सोनाई, इंदापुर, खर्डा यासह आन्य ठिकाणी दलीतांवर अत्याचार करण्यात आले आहे. तसेच दौंड तालुक्यातील खोरवडी येथे साहेबराव दोडके या दलीत कुटुंबावर गेल्या पाच वर्षापासुन गाव गुंड व वाळु माफीया अन्याय करीत आहे.
4दरम्यान या घटना लाजीरवाण्या असुन या मुळे संपुर्ण दलीत समाज पेटुन उठला आहे. तेव्हा शासनाने दलीतांवर होणारे अत्याचार थांबवावे अन्यथा भविष्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलने केले जातील, अशा इशारा
देण्यात आला.