शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

सर्व जागा आणा; अध्यक्षपद मिळवा!

By admin | Published: January 12, 2017 2:16 AM

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ज्या तालुक्यात

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ज्या तालुक्यात सर्वच्या सर्व जागा पक्षाचे उमेदवार निवडून येतील, त्यांनाचा अध्यक्षपद व उपाध्यक्षपद देण्यात येईल, असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांना येथे दिली. दरम्यान, इच्छुकांची प्रचंड संख्या लक्षात घेता निवडणुकीत ऐकमेकांचे पाय न ओढल्यास राष्ट्रवादी पक्षाचा अन्य कोणी पराभव करू शकत नाही, असेदेखील पवार यांनी येथे स्पष्ट केले.जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दोन दिवसांपासून मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयत सुरू आहे. या वेळी शिरूर, बारामती, जुन्नर, खेड, हवेलीसारख्या मोठ्या तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे. एका जागेसाठी एकच उमेदवार द्यावा लागेल, त्यामुळे अन्य इच्छुक उमेदवारांनी नाराज न होता पक्ष देईल, त्या उमेदवाराचे सर्वांनी एक निष्ठेने काम केल्यास राष्ट्रवादीचा पराभव होणे कठीण आहे. यामुळे या निवडणुकीत ज्या तालुक्यात पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील व सर्वाधिक जागा आणणाऱ्यांनाच अध्यक्षपद, उपाध्यक्षपद व अन्य पदाधिकारीपदे दिली जातील, असे पवार यांनी स्पष्ट केले.निलंबित केलेल्याचा अर्ज कसा स्वीकारलाशिरुर तालुक्यातील शिक्रापूर-सणसवाडी येथील ओबीसी महिला राखीव गटातून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा मंगलदास बांदल यांनी इच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँगे्रसकडे अर्ज केला. या तालुक्याच्या मुलाखती सुरू झाल्यानंतर रेखा बांदल यांचे नाव पुकारण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले व आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातून जाहीरपणे हकालपट्टी करण्यात आलेल्या लोकांचा अर्ज तरी कसे स्वीकारला, असा सवाल उपस्थित केला. यामुळे काही काळ व्यासपीठावर शांतता पसरली.पुरंदरमध्ये आघाडीबाबत लवकरच निर्णयजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी होणे सध्या तरी कठीणच आहे. परंतु पुरंदर तालुक्यात आघाडीबाबत चर्चा करण्याबाबत निरोप आला आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.ओबीसीच्या जागेवर त्याच प्रवर्गाला संधीजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सुमारे २७ टक्के जागा इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव आहेत. या जागांवर अनेक बोगस कुणबी दाखले असलेल्या इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. परंतु याबाबत अजित पवार यांनी सांगितले, की इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविताना आरक्षित जागांसाठी जात प्रमाणपत्रही घेण्यात आले आहे. यामध्ये ओबीसीच्या जागेवर अन्य कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यात मात्र खुल्या गटात अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार द्यावे लागणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले.