शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

उंड्री - एनआयबीएम रोडवर ब्रेक फेल टेंपोने वाहनांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:45 IST

उंड्री - एनआयबीएम रोडवर आयशर टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने दोन - तीन गाड्यांना उडविले. एनआयबीएम रोडवर दोराबजी मॉलसमोर हा अपघात चारच्या सुमारास झाला. (एमपी ०९ डीजी १२५३) हा आयशर टेम्पो उंड्रीकडून कोंढवाकडे जात असताना उतारावर टेम्पोचालकाला ब्रेक निकामी झाल्याचे समजले व त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला, त्यातच हा रस्ता उताराचा .

कोंढवा : उंड्री - एनआयबीएम रोडवर आयशर टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने दोन - तीन गाड्यांना उडविले. एनआयबीएम रोडवर दोराबजी मॉलसमोर हा अपघात बुधवारी चारच्या सुमारास झाला. (एमपी ०९ डीजी १२५३) हा आयशर टेम्पो उंड्रीकडून कोंढवाकडे जात असताना उतारावर टेम्पोचालकाला ब्रेक निकामी झाल्याचे समजले व त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला, त्यातच हा रस्ता उताराचा . टेम्पोचालकाने पुढे जात असलेल्या शाळेची मुले ने- आण करणाºया मारुती व्हॅन (एमएच १२ जेसी ८२७०) ला मागून उडविले. सुदैवानं त्यात शाळकरी मुले नव्हती, व्हॅनचालक सिद्धार्थ गेडाम (वय २८) व त्याची आई शीलाबाई गेडाम यांना पोटाला व डोक्याला मार लागला. त्यानंतर त्याने एक स्कूटरला उडविले, परंतु स्कूटरचालकाला किरकोळ दुखापत झाली व तो बाजूला फेकला गेला.त्यानंतर ताबा सुटलेला टेम्पो विरुद्ध बाजूने येणा-या पाण्याचा टँकरला (एमएच ०४ सीजी ७५२४) समोरासमोर धडकला. ही धडक जोरात झाल्याने दोन्ही वाहनचालक जबर जखमी झाले आहेत. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलिसांनी घटनेची खबर मिळताच ताबडतोब जखमींना दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले.कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत निंबाळकर व त्यांच्या सहका-यांनी त्वरीत अपघातग्रस्त वाहने हलविली व वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे