शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चक्क आजारी आरोपीलाच मागितली २० हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 00:45 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा शुक्रराज येरवडा तुरुंगात कोठडीमध्ये आहे़

पुणे : तुरुंगात आपल्या ओळखीच्या असलेल्या व्यक्तीला भेटण्याकरिता नातेवाईक पोलिसांना कायमच ‘‘चिरीमिरी’’ देत असल्याचे बोलले जाते. ज्या व्यक्तीला भेटायला नातेवाईक आले आहेत त्यांना बोलण्याकरिता, भेटीकरिता वेळ मिळावा, यासाठीदेखील पोलीस पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार नागरिक करीत असतात. मात्र आता चक्क आजारी असल्याने ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असलेल्या मुलाला भेटू देण्यासाठी दोघा पोलिसांनी वडिलांकडे चक्क २० हजार रुपयांची लाच मागितली़ या घटनेमुळे पोलीस प्रशासनासमोर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा शुक्रराज येरवडा तुरुंगात कोठडीमध्ये आहे़ आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तुुरुंगात उपोषण सुरू केले आहे़ त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे़ तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ त्यांच्या बंदोबस्तासाठी स्वप्निल भद्रे आणि अनोश गायकवाड यांची नेमणूक केली आहे़ त्याच्या वडिलांनी मुलाला भेटू देण्यासाठी विनंती केली़ तेव्हा त्यांनी मुलाला भेटायचे असेल तर २० हजार रुपयांची मागणी केली़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री सापळा रचून या दोघा पोलिसांना रंगेहाथ पकडले़ स्वप्निल भीमराव भद्रे (वय ३०, रा़ विश्रांतवाडी पोलीस लाईन), अनोश आॅगस्टिन गायकवाड (वय २४, रा़ कनक अपार्टमेंट, दौंड) अशी पोलीस मुख्यालयाच्या पोलीस शिपायांची नावे आहेत़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी