लाच घेणाऱ्या पोलिसास अटक

By Admin | Updated: July 16, 2014 04:17 IST2014-07-16T04:17:14+5:302014-07-16T04:17:14+5:30

कंटेनर पलटी झाल्याची चाकण पोलिस पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी ८ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली

Bribe polices arrested | लाच घेणाऱ्या पोलिसास अटक

लाच घेणाऱ्या पोलिसास अटक

पुणे : कंटेनर पलटी झाल्याची चाकण पोलिस पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी ८ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
महेश दादासाहेब पवार (वय ३०, रा. बारामती) असे अटक केलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. तक्रारदारांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. साबळेवाडी येथे त्यांच्या कंटेनरचा अपघात झाला होता, त्याची चाकण पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी ते गेले असता त्यांना दहा हजार रूपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ८ हजार रूपये द्यायचे ठरले. त्यानंतर तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Bribe polices arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.