शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी दराडेंच्या सांगण्यावरून स्विकारली लाच, अधीक्षक मेनन यांची एसीबीला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:44 IST

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी मेनन यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

ठळक मुद्देआरटीई अनुदान बिल मंजूर लाच प्रकरणी २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांच्या सांगण्यावरून लाच स्विकारली असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन यांनी लाचलुचपत प्रबिबंधक विभागाला (एसीबीला) दिली आहे.            शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी मेनन यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.  ती स्वीकारताना सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल कार्यालयात मेनन (वय ४५,  रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि क्लार्क  महादेव मच्छिंद्र सारुख (वय ४७, रा़. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मेनन व सारुखला विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणा‍-या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़ शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते़  त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे १७ लाख रुपयांचे बील मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते़  ते बील मंजूर करून रक्कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची (१० टक्के) लाच मागितली होती. परंतु, लाच देणे मान्य नसल्याने याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली होती.          मेनन  यांनी लाचेची रक्कम मी दराडे मॅडमच्या सांगण्यावरून स्विकारण्यास गेले असल्याचे एसीबीला सांगितले आहे. या गुन्ह्यात त्यांचा खरोखर सहभाग आहे का ? याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. लाचेची रक्कम ही मोठी असून त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याबाबत तपास करायचा आहे. आरोपींचे रेकॉर्ड तपासून आणखी कोणाकडून लाच स्विकारली आहे का आबाबतचाही तपास करणे आवश्यक आहे. मेनन आणि सारूक या दोघांच्याही आवाजाचे नमुणे घेणे आवश्यक असल्याने दोघांनाही पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.  एसीबी पुणे पोलिस निरीक्षक अरूण घोडके गुन्ह्याचा तपास करत आहेत.

..............

आरोपामध्ये तथ्य नाहीसबंधीत शाळेची काय काय तक्रार आहे, हे पाहून शाळेची शुल्क प्रतिपूर्ती करण्यास मेनन यांना सांगितले होते. मेनन यांनी माझ्या सांगण्यावरून पैसे घेतल्याच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. - शैलजा दराडे, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे     

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकCorruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हा