शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Breaking: आरोग्य भरतीचा पेपर न्यासा कंपनीतूनही फुटला; पेपरफुटीच्या दोन लिंक उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 12:17 IST

आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्या आहेत

पुणेसध्या राज्यभर अनेक पेपरफुट प्रकरणे गाजत आहेत. अशात आरोग्य भरती पेपरफुटीप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच गट 'क' चा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी 2 एजंटना पोलिसांनी अटक केली आहे. 

न्यासा कंपनीने जिथून पेपर प्रिंट केला, तिथूनच तो दलालांना पुरविला गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यावरून 2 एजंटना अटक करण्यात आली आहे.पेपरफुटीप्रकरणी  निशीद रामहरी गायकवाड आणि राहुल धनराज लिंघोट (दोघेही राहणारे अमरावती) या दोन आरोपींना अटक केली आहे. या एजंटनी फोडलेले पेपर काही परिक्षार्थींना 5 ते 8 लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. 

पेपरफुटीच्या दोन लिंक-

आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी दोन लिंक समोर आल्या आहेत. पहिल्यांदा महेश बोटलेने (तत्कालिन सह संचालक आरोग्य विभाग, मुंबई) पेपर फोडल्याचे समोर आले होते. त्यावेळी प्रशांत बडगिरे (तत्कालिन मुख्य प्रशाकिय अधिकारी, आरोग्य विभाग लातूर) आणि डॉ. संदीप जोगदंड (तत्कालिन वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभाग लातूर), राजेंद्र सानप यांनाही अटक करण्यात  आली होती.  आता हा पेपर जिथून प्रिंट झाला तिथूनच फुटला असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे या पेपरफुटीच्या दोन लिंक आतापर्यंतच्या तपासात समोर आल्या आहेत. 

यामुळे आता आरोग्य भरती गट क परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत 5 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच यामध्ये आतापर्यंत २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर जवळपास 6 कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र