घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:14+5:302021-02-05T05:10:14+5:30
याबाबत रवींद्र दाते यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पुढील तपास पोलीस करत आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...

घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस
याबाबत रवींद्र दाते यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.
मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुना चांडोली रोड वृंदावन सोसायटीच्या बाजूला राहत असलेले रवींद्र वामन दाते यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. घरातील मंगळसूत्र, कानातले वेल, चैन, अंगठी, जोडवी,पायातल्या पट्ट्या व रोख रक्कम चौदाशे रुपये असा एकूण १ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. रवींद्र दाते हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द येथे रात्रपाळीच्या कामास असून त्यांची पत्नी माहेरी गेली असल्याने ते घराला कुलूप लावून कामाला गेले होते. ते कामाला गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून रात्रीच्या वेळी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ऐवज चोरून नेला आहे. याबाबत पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याबाबत रवींद्र दाते यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.