शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

Breaking: पुण्यात घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग घेणाऱ्या २७ बड्या बुकींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 15:04 IST

वानवडी, कोंढवा, हडपसर भागात अनधिकृतपणे घेत होते बुकींग

ठळक मुद्देबेटिंग घेण्यासाठी वापरलेले साहित्य तसेच मोबाईल असा ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त

पुणे : रेसकाेर्स येथील घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे बेटिंग घेणाऱ्यावर पुणेपोलिसांनी मोठी कारवाई केली असून शहरातील विविध चार ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात आले. त्यात २७ बडे बुकी तसेच खेळायला येणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात शनिवारी पहाटेपर्यंत ही कारवाई सुरु होती. याप्रकरणी वानवडी, कोंढवा, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शब्बीर मोहसीन खंबाटी (वय ७०, रा. पदमव्हिला सोसायटी, वानवडी) यांना अटक केली आहे. सध्या मुंबई येथील रेसकोर्सवर कोराेना सेंटर तयार केले असल्याने तेथील शर्यती पुण्यात होत आहेत. रेसकार्समध्ये शासनाचा परवाना घेऊन त्यांचा सर्व कर भरुन बेटिंग घेणाऱ्यांना परवाना दिला जातो. मात्र, त्याशिवाय किक्रेटप्रमाणे टीव्हीवर शर्यती पाहून हे बेटिंग घेत होते. घोड्यांच्या नावाने बेटिंग घेत होते. या बंगल्यातून पोलिसांनी बेटिंग घेण्यासाठी वापरलेले साहित्य तसेच मोबाईल असा ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

घोरपडी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील डोबरबाडी येथे मोकळ्या मैदानात शुक्रवारी दुपारी बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. याठिकाणी पोलिसांनी छापा घालून बेटिंग घेणारे व खेळणारे अशा २० जणांना अटक केली आहे. तन्मय वाघमारे हा त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये दुसर्याच्या नावाचे सीमकार्ड वापरून सीमकार्डधारकाची फसवणुक करुन बेटिंग घेताना मिळून आला. यात अनेक बड्या असामीचा समावेश आहे.याबरोबरच हडपसर तसेच कोंढवा येथे छापा घालून बेटिंग घेणार्यांना अटक करण्यात आली आहे.

बेकायदेशीरपणे बेटिंग घेणार्या व खेळणार्या मोठ्या रॅकेटवर ही इतक्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक