शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking: पुण्यातल्या किडनी तस्करी प्रकरणातील २ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 19:52 IST

किडनी तस्करी प्रकरणात रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे : रूबी हॉल रूग्णालयामधील बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात दोन मुख्य एजंटांना भोसरी येथून कोरेगाव पार्क पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. एका एजंटच्या नाव व पत्यावरून दुस-या एजंटाचा शोध घेण्यात आला आणि तोही पोलिसांना सापडला. या प्रकरणातील हे दोन महत्वाचे आरोपी आहेत. त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याने त्यांना 18 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी दिली.

अभिजीत शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत विटभट्टी, एरंडवणे गावठाण), रवींद्र महादेव रोडगे (वय 43, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्या एजंटांची नावे आहेत. याबाबत, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम (वय 59, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.आॅगस्ट 2021 ते मार्च 2022 दरम्यान ग्रँट मेडीकल फाऊंडेशन रुबीहॉल हॉस्पीटल मध्ये घडला. किडनी प्रत्यारोपणासाठी अमित व सुजाता साळुंखे दाम्पत्याने एजंट रवींद्र रोडगे आणि अभिजित गटणे यांच्या मदतीने कट रचला. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून रूबी हॉल येथे सादर केली. तर, अन्य आरोपींनी कागदपत्रांची खात्री न करताही कागदपत्रे रिजनल आॅथोरायजेशन कमिटीकडे (ससून) पाठवून दिशाभूल केली. त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याचेउल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी  अटक आरोपींसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          दरम्यान, याप्रकरणी गटणे व रोडगे याला अटक करत न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड युक्तिवादादरम्यान म्हणाले, आरोपींनी अमित साळुंखे व किडनी देणा-या महिलेस कोणाच्या मदतीने संपर्क साधला. महिलेला किडनी देण्यासाठी किती पैसे देण्याचे कबूल केले होते तसेच तिला किती पैसे दिले. गुन्ह्यातील बनावट दस्ताऐवज आरोपींनी कोठे तयार केले यासह गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अँड. गायकवाड यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

किडनी दान करणारी झाली बायको

बेकायदा किडनी प्रत्योरापण प्रकरणात किडनी दान करणारी महिला व किडनीची आवश्यकता असलेला पुरूष हे पती-पत्नी असल्याचे दाखविण्यासाठी आरोपींनी लग्नाचे बनावट  छायाचित्र, आधार व मतदार ओळखपत्र तयार केल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी एस पाटील यांच्या न्यायालयाला दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdocterडॉक्टरArrestअटक