जेजुरी वीज उपकेंद्रात बिघाड; बारामतीच्या नऊ गावांना केवळ एक तास वीज मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 11:08 AM2021-03-05T11:08:40+5:302021-03-05T11:36:38+5:30

जेजुरी येथील वीज उपकेंद्रामध्ये बिघाड झाला आहे.

Breakdown at Jejuri power substation; Nine villages in Baramati will get only one electricity | जेजुरी वीज उपकेंद्रात बिघाड; बारामतीच्या नऊ गावांना केवळ एक तास वीज मिळणार 

जेजुरी वीज उपकेंद्रात बिघाड; बारामतीच्या नऊ गावांना केवळ एक तास वीज मिळणार 

googlenewsNext

मोरगांव : जेजुरी उपकेंद्रामध्ये झालेल्या तांत्रिक  बिघाडामुळे  बारामती तालुक्यातील लोणी भापकर व मोरगाव  बिट अंतर्गत येणाऱ्या  ९ गावांना तसेच पुरंदर तालुक्यातील १०  गावांना पुढील दोन दिवस थ्री फेज पुरवठा  दिवसातील फक्त  एक तास होणार आहे. जेजुरी (४०० के.व्ही  ) उपकेंद्रावरुन  मुख्य विज वाहीनी बारामती तालुक्यातील  लोणी भापकर उपकेंद्र (  ३३/११ ) ,   मोरगांव  व पुरंदर तालुक्यातील पिसर्वे  उपकेंद्रामध्ये येते.  

जेजुरी येथील वीज उपकेंद्रामध्ये बिघाड झाला आहे. यामुळे पळशी,सायंबाची वाडी, लोणी (शिंदे मळा)  ३ फेज पुरवठा  दिवसातून फक्त  १ तास  पिण्याचे पाणी भरुन घेण्यासाठी मिळणार आहे . तर मोरगांव उपकेंद्रा अंतर्गत  येणाऱ्या मोरगाव , तरडोली , मुर्टी , मोढवे , जोगवडी व आंबी  या सहा गावांना दिवसातील एक तास विज पुरवठा होणार आहे .

तसेच पुरंदर  तालुक्यातील पिसर्वे  उपकेंद्रा अंतर्गत पिसर्वे , मावडी पिंपरी, नायगाव  टेकवडी, राजुरी, रिसेपिसे , माळशिरस , राजेवाडी  ,पोंढे  या दहा गावांचा सलग दोन दिवस थ्री फेज  वीजपुरवठा खंडीत होणार आहे .  पिण्याचे पाणी भरण्यासाठी वरील गावांना दिवसातील केवळ एक तास थ्री फेज पुरवठा सुरु केला जाणार आहे . तर सिंगल फेज सुरळीत सुरु राहणार आहे . जेजुरी सब स्टेशनचे काम युद्धपातळीवर सूरु असल्याने कदाचीत आजच दुरुस्ती पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहीती मोरगाव महावितरण कंपनीचे शाखा अभीयंता नाळे यांनी दिली .

Web Title: Breakdown at Jejuri power substation; Nine villages in Baramati will get only one electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.