शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Break the chain निर्बंधांचा उद्योगांना फटका. उत्पादनात चौदा टक्क्यांची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 12:29 IST

मराठा चेंबर चे सर्वेक्षण

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचा पुणे आणि परिसरातल्या कंपन्यांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये कंपन्यांचे उत्पादन जवळपास 14 टक्क्यांनी आणि मनुष्यबळही 16 टक्क्यांनी घटल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर म्हणजे एम सी सी आय ए ने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

पहिल्या लॉकडाऊन पासून मराठा चेंबर च्या वतीने सातत्याने सर्वेक्षण केले जात आहे. त्यातील तेराव्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष रविवारी जाहीर करण्यात आले. या सर्वेक्षणात जवळपास दीडशे कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. मार्चमध्ये कंपन्यांची उत्पादन पातळी 83 टक्के होती तर कार्यरत मनुष्यबळ 86 टक्के होते पण यात घट होऊन एप्रिल मध्ये उत्पादन पातळी 69% आणि कार्यरत मनुष्यबळ 70 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी 24 टक्के कंपन्यांनी कोरोना पूर्व काळातील उत्पादन पातळी गाठली आहे तर 19 टक्के कंपन्यांनी सावरायला आणखी तीन महिने तर 35 टक्के कंपन्यांनी साधारण तीन ते सहा महिने लागतील असा अंदाज वर्तवला आहे. 22 टक्के कंपन्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

याविषयी बोलताना एम सी सी आय ए चे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले ," पुरवठ्याची साखळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळे लघु तसेच अनौपचारिक उत्पादक यांच्याबाबत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे."

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक