शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

धाडसी मेंढपाळाने बिबट्यावरच प्रतिहल्ला करत वाचवला मुक्या प्राण्याचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 19:22 IST

जखमी मेंढीला सोडुन बिबट्याने काढला पळ

बारामती : बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे बिबट्याने सोमवारी(दि २०) सायंकाळी कळपातील मेंढीवर  हल्ला केला. यावेळी कळपातील मेंढी बिबट्याने फरपटत नेली.मात्र, धाडसी मेंढपाळाने बिबट्यावर काठीने प्रतिहल्ला केला.त्यामुळे जखमी मेंढीला सोडुन बिबट्याने पळ काढला. या प्रकरणाची दखल वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री भरणे यांनी वनविभागाला दिले.महादेव मारुती काळे असे या धाडसी मेंढपाळाचे नाव आहे. आज सायंकाळीकाटेवाडी —कन्हेरी रस्त्यावर धनेवस्ती येथे काळे यांच्या मेंढ्याचा कळपचरत होता. यावेळी ४.३० च्या सुमारास बिबट्याने अचानक कळपातील मेंढीमानेला जबड्यात धरुन फरपटत नेली. यावेळी मेंढ्या चराईसाठी येथेथांबलेल्या काळे यांनी हा प्रकार पाहुन धाडसीपणाने बिबट्याचा पाठलाग केला.तोपर्यंत बिबट्याने तीन चार एकर क्षेत्रातुन मेंढी फरपटतोली.मात्र, काळे यांनी त्याचा पाठलाग सुरु ठेवत त्याच्यावर काठीने हल्लाकेला.त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडत ऊसक्षेत्रामध्ये पळ काढला.काळेयांनी मोठ्या धाडसाने मेंढीचा जीव वाचवला आहे.  या घटनेमुळे परीसरातदहशतीचे वातावरण आहे. येथील स्थानिक शेतकरी भाऊसाहेब काटे यांनीह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले की, आज सायंकाळी अचानक बिबट्याने हल्ला केला.आमच्या परीसरात सर्व शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शेतकरी शेतीलापाणी द्यायला सुध्दा घराबाहेर पडायला तयार नाहित.शेतकºयांसह दुभत्याजनांवरदेखील बिबट्याच्या हल्लयाच्या भीतीचे सावट आहे.अवघ्या तीन दिवसांपुर्वी  बिबट्याने परीसरात शुक्रवारी (दि १७) रात्रीकुत्र्याचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परीसरात दहशतीचे वातावरण पसरलेआहे.वनखात्याने या भागात तातडीने रात्रीची गस्त सुरु केली आहे. या भागातवनखाते ह्यट्रॅप कॅ मेरेह्ण  लावणार आहे.बारामती कटफळ परिसरातील एमआयडीसीतील बाऊली इंडिया  बेक्स अँड स्वीटस प्रा.ली. कंपनीच्या  आवारात  ९ डीसेंबर२०१९ रोजी बिबट्याचा   वावर कंपनीच्या सीसीटीव्ही मध्ये कै द झालाहोता.हा बिबट्या अद्याप बारामती तालुक्यातच वावरत आहे. आजपर्यंत याबिबट्याला प्रत्यक्ष कोणीही पाहिले नव्हते.मात्र, आज मेंढीवरील हल्लाझाल्यानंतर त्याच्या हल्लयाला प्रत्यक्ष मेंढपाळानेच तोंड दिले.त्यामुळेतो बिबट्याच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना हि घटनागांभीयार्ने घेत याप्रकरणी आवश्यक उपाययोजना करण्याचे वनविभागाला आदेशदिल्याचे सांगितले. शेतकºयांनी घाबरुन जावु नये,असे आवाहन भरणे यांनीकेले आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीleopardबिबट्याforestजंगल